Thursday, July 20, 2023

शासन आपल्या दारी सफाई कामगारांच्या कुटुंबियांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 

शासन आपल्या दारी सफाई कामगारांच्या कुटुंबियांनी

महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 20 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळांतर्गत केंद्र शासन पुरस्कृत राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्त विकास महामंडळ, नवी दिल्ली (एनएसकेएफडीसी) मार्फत अस्वच्छ सफाई कामगारांवर अवलंबून असणाऱ्यांच्या पुर्नवसनासाठी एनएसकेएफडीसी कर्ज योजना राबविल्या जाते.

 

या महामंडळाच्या व्यावसायिक कर्ज योजनेंतर्गत सन 2023-24 या आर्थिक वर्षासाठी एकूण भौतिक 91 व आर्थिक 405 लक्ष कर्ज प्रकरणांचे उद्दिष्ट प्राप्त आहे. सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील पात्र अर्जदारांनी कर्जासाठी विहित नमुन्यातील अर्ज महामंडळाचे http://mpbcdc.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने सादर करावे. ऑनलाईन अर्जाच्या प्रतीसह सफाई कर्मचारी कुटुंबातील असल्याबाबतचा दाखला, उद्योम आधार, पासपोर्ट छायाचित्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, दरपत्रक इत्यादी आवश्यक कागदपत्रांसह महामंडळाचे जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलीस आयुक्त कार्यालयाच्या मागे, चांदुररेल्वे रोड, अमरावती येथे सादर करण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक श्रीमती एम. अवघाते यांनी केले आहे.

 

00000

 

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...