वाहन पुरवठा करणाऱ्या वाहतूकदारांना आवाहन

 

वाहन पुरवठा करणाऱ्या वाहतूकदारांना आवाहन

            अमरावती, दि. 14 : सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय, अमरावती कार्यालयास जिल्ह्यातील मच्छिमार सहकारी संस्थांच्या तलावात मत्स्यबीज केंद्रातून वाहनाव्दारे मत्स्यबोटुकली संचयन करण्याच्या कामासाठी निविदा दरपत्रक दि. 25 जुलै 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत सहायक आयुक्त (तां.) अमरावती, आशिष ठाकरे यांची इमारत, केशव कॉलनी, विद्याभारती कॉलेज जवळ, कॅम्प रोड, अमरावती येथे मागविण्यात येत आहे. शहरातील भाडेत्त्वावर आवश्यकतेप्रमाणे वाहन उपलब्ध करुन घेण्यासाठी प्रती कि.मी. दराप्रमाणे वाहन पुरवठा करणाऱ्या फर्म, वाहतूकदार यांना यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

मत्स्यबीजाचे डबे, पिशव्या वाहतुक करून तलावापर्यंत पोहचवणे तसेच जिल्ह्यातील मत्स्यबीज उत्पादन व संवर्धन केंद्राचे कार्य मत्स्यखाद्य, जाळे, मत्स्यबीज पॅकींग पिशव्या, चुना व इतर साहित्य मत्स्यबीज केंद्रापर्यंत पोहचवणे व इतर कार्यालयीन अनुषंगिक कामासाठी टाटा-407 श्रेणीतील वाहन, टाटा छोटा हत्ती, पिकअप वाहन व जीप श्रेणीतील वाहन (टाटा सुमो, महिंद्रा बोलेरो) या वाहनांची आवश्यकता आहे. ही जाहीरात कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी  दुरध्वनी क्रमांक  0721-2662421 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय सुरेश भारती यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती