सहकार
विभागांतर्गत जी.डी.सी. अँड ए व सी.एच.एम. परीक्षा
अमरावती, दि. 17 (जिमाका): सहकार विभागाद्वारे 24 ते 26 मे 2024 या कालावधीत सहकार विभागांतर्गत जी.डी.सी अँड ए व सी.एच.एम. परिक्षा गणेशदास राठी विद्यालय, पंचवटी चौक, मोर्शी रोड, अमरावती या केंद्रावर घेण्यात येणार आहे. परिक्षेला बसलेल्या परिक्षार्थ्यांना त्यांचे प्रवेशपत्रे पोष्टाव्दारे पाठविण्यात आलेली आहे. ज्या परिक्षार्थींचे नाव पात्र यादीमध्ये आहेत परंतु प्रवेशपत्र वेळेवर प्राप्त झालेले नाही अशा परिक्षार्थ्यांनी पॅनकार्ड, मतदान कार्ड, ड्राईविंग लायसन्स, आधार कार्ड, पासपोर्ट ओळखपत्र दाखवून परिक्षेस बसता येईल. अधिक माहितीसाठी जिल्हा उपनिबंधक, सहाकारी संस्था, अमरावती सहकार संकुल, कांता नगर अमरावती येथे किंवा दुरध्वनी क्र. 0721-2661633 व मोबाईल क्र. 9370103913 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अे. एस. उल्हे यांनी केले आहे.
000000
No comments:
Post a Comment