डी.एल.एड प्रथम वर्ष ऑनलाईन प्रवेशासाठी
3 ऑगस्ट पर्यत मुदतवाढ
          अमरावती, दि.01 : सन 2016-17 ची डी.एल. एड. प्रथम वर्ष प्रवेश चालू वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने सुरु असून दि.21 जुलै, 16 ते दि.31 जुलै, 16 या कालावधीत प्रवेश अर्ज भरावयाचे होते. तथापि सदर डी.एल.एड. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यास दि.3 ऑगस्ट,16 पर्यत आणि पडताळणी केंद्रावर जाऊन अर्जाची पडताळणी करुण घेण्यासाठी दि.4 ऑगस्ट,16 पर्यत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे चे संचालक गोविंद नांदेडे यांनी कळविले आहे.
0000000
वृत्त क्र.793                                                         दिनांक 01-08-2016
अमरावती जिल्ह्यातील उर्ध्व वर्धा प्रकल्पाचे 3 गेट उघडले
* सिंचन प्रकल्पात 80.38 टक्के जलसाठा
       अमरावती, दि.01 : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवित येणाऱ्या महसुल सप्ताहातंर्गत अंजनगांव सुर्जी येथील टाकरखेडा मोरे येथे महिला सक्षमीकरण कार्यक्रमाच्या माध्यमाने जिल्हा स्तरीय महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. दर्यापुर विधानसभा मतदार संघाचे आमदार रमेश बुंदीले यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. पंचायत समितीचे सभापती विनोद टेकाडे यांच्या अध्यक्षतेखाली
जिल्ह्यात उर्ध्व वर्धा हा मोठा प्रकल्प, शहापूर, चंद्रभागा, पूर्णा आणि सपन हे चार माध्यम प्रकल्प आणि 77 लघु प्रकल्प असे एकुण 82 सिंचन प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांचा उपयुक्त पाणी साठा क्षमता 905.15 द.ल.घ.मी. आहे. दि.1 ऑगस्ट, 16 पर्यंत जिल्ह्यात 631 मि.मी. पाऊस झाला आहे. सध्या या सर्व प्रकल्पामध्ये 80.38 टक्के म्हणजे 727.52 द.ल.घ.मी. पाणी साठा निर्माण झाला आहे. उर्ध्व वर्धा प्रकल्पात 87.68 टक्के, शहानुर 71.72 टक्के, चंद्रभागा 64.17 टक्के, पुर्णा 61.41 टक्के, सपन 69.04 टक्के आणि 77 लघु प्रकल्प 69.57 टक्के भरले आहे.
00000



वृत्त क्र.794                                                        दिनांक 01-08-2016
राज्य निवडणुक आयोगाने घोषित केलेल्या माहे सप्टेंबर ते डिसेंबर 2016
या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींच्या
सार्वत्रिक व रिक्त पदांच्या पोट निवडणुकांसाठी कार्यक्रम
       अमरावती, दि. 01 :मुंबई ग्रामपंचायत (निवडणुक) नियम, 1959 मधील नियम 7 मधील पोट नियम (1) अन्वये राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाची प्रत व पोट नियम (2) नुसार नमुना अ अ मधील निवडणुकीची नोटीस दि.25 जुलै, 2016 घोषित करण्यात आली आहे.
          मुंबई ग्रामपंचायत (निवडणुक) नियम, 1959 मधील नियम 7 मधील पोट नियम (1) अन्वये दि.3 ऑगस्ट, 16 (बुधवार) ते दि.09 ऑगस्ट, 16 (मंगळवार) वेळ स.11 ते दु.3 वाजेपर्यंत (रविवार दि.7 ऑगस्ट, 16 हा सर्वजनिक सुट्टीचा दिवस वगळुन) नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा (नमुना अ मध्ये नमुद केलेल्या ठिकाणी) कालावधी निश्चित करण्यात आला आहे.
          मुंबई ग्रामपंचायत (निवडणुक) नियम, 1959 मधील नियम 7 मधील पोट नियम (1) चा खंड (ब) नुसार दि.10 ऑगस्ट, 16 (बुधवार) वेळ स.11 वाजल्यापासुन छाननी संपेपर्यंत (नमुना अ अ मध्ये नमुद केलेल्या ठिकाणी) नामनिर्देशनपत्र छाननी करण्यात येईल.
          मुंबई ग्रामपंचायत (निवडणुक) नियम, 1959 मधील नियम 7 मधील पोट नियम (1) चा खंड (क) नुसार दि.12 ऑगस्ट, 16 (शुक्रवार) दु.3 वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेण्यासाठी अवधी देण्यात येणार आहे. दि.12 ऑगस्ट, 16 (शुक्रवार) दु.3 वाजता नंतर निवडणुक चिन्ह नेमुन देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
          मुंबई ग्रामपंचायत (निवडणुक) नियम, 1959 मधील नियम 7 मधील पोट नियम (1) चा खंड (ड) नुसार आवश्यक असल्यास दिनांक दि.24 ऑगस्ट, 16 (बुधवार) स.7-30 वा.पासून ते सायं.5-30 वा.पर्यंत (गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यासाठी स.7-30 वा.पासून ते दु.3 वाजेपर्यंत) या भागातील मतदात्यांना मतदानाचा अधिकार बजावण्याची संधी दिली जाणार आहे.
          दि. 26 ऑगस्ट, 16 (शुक्रवार) रोजी मतमोजणी केली जाईल. (ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहिल.
          मुंबई ग्रामपंचायत (निवडणुक) नियम, 1959 मधील नियम 37 नुसार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा अंतिम निकाल दि.29 ऑगस्ट, 16 (सोमवार) प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे राज्य निवडणुक आयोगाचे सहाय्यक आयुक्त के.सूर्यकृष्णमूर्ती यांनी कळविले आहे.
00000

काचावार/गावंडे/कोल्हे/दि.01-08-16/15-35 वा. 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती