Saturday, August 20, 2016

जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा तारखांमध्ये बदल

          अमरावती दि. 16 (जिमाका): जिल्हा स्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन 25 जुलै, 16 पासुन सुरु झालेले आहे. यापैकी तांत्रिक कारणास्तव बदल झालेल्या क्रीडा स्पर्धा पुढील प्रमाणे.  
          बास्केट बॉल 14, 17, 19 वर्ष मुले-मुली स्पर्धेचा दिनांक 29 ते 30 ऑगस्ट 2016, 30 ते 31 ऑगस्ट, 16 व 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर, 16 दरम्यान विभागीय क्रीडा संकुल अमरावती येथे होतील. जलतरण स्पर्धा 14, 17, 19 वर्षे मुले-मुली 1 ते 2 सप्टेंबर, 16 रोजी हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे होतील. रायफल शुटींग 14, 17, 19 वर्षे मुले-मुली 3 ते 4 सप्टेंबर रोजी वीर शुटींग स्पोटर्स अकादमी, पारश्री हॉस्पीटल, खापर्डे बगीचा अमरावती येथे होतील.
वरील बदल लक्षात घेता शाळांनी सुधारीत तारखेत वयोगट निहाय सकाळी 9 वा. संघ उपस्थित ठेवावे, असे जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांनी कळविले आहे.
00000


No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...