जिल्हाधिकारी यांनी दिला ‘एक भारत, श्रेष्ठ भारत!’ चा संदेश
भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या
‘कलर्स ऑफ इंडिपेंडन्स’ सप्ताहाची सुरुवात
       अमरावती, दि.9 (जिमाका): भारताला स्वातंत्र्य मिळुन 70 वर्ष पुर्ण होत असुन यानिमित्त भारत सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने दि. 9 ते 15 ऑगस्ट पर्यत ‘कलर्स ऑफ इंडिपेंडन्स’ सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. स्थानीय राजकमल चौक येथे दि. 9 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या हस्ते संदेश लिखानाने सप्ताहाची सुरुवात करण्यात आली. जिल्हाधिकारी यांनी ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ असा संदेश देत सर्वांना या सप्ताहात उत्स्फुर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
‘कलर्स ऑफ इंडिपेंडन्स’ सप्ताहाच्या उद्घाटन सत्रात आमदार डॉ. सुनील देशमुख, फिनले मिल अचलपुरचे जनरल मॅनेजर संदीप शर्मा, नोडल अधिकारी राहुल वानखडे, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक उदय पुरी, एमआईडीसी असोसिएशनचे अध्यक्ष किरण पातुरकर, फिनले मिलचे सत्यनारायण तिवारी, विपीन मोहने, रवि माहुलकर, नवयुवक मंडळाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी ‘करो या मरो’ या राष्ट्रपिता महात्मा गांधीचा संदेश यानिमित्त दिला.  
देशाच्या 70 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभरातील 70 शहरांमध्ये भारत सरकार वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वतीने ‘कलर्स ऑफ इंडिपेंडन्स’ हा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यामध्ये अमरावती शहराचा देखील समावेश आहे. यात जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या प्रेरणेने राष्ट्रीय वस्त्रोद्योग महामंडळाच्या फिन्ले मिल प्रा. लि. अचलपूर यांच्या तर्फे शहरातील विविध ठिकाणी खादीच्या 12 बाय 9 मीटर कापडाचा फ्लैक्स/ बोर्ड उभारण्यात येत आहेत. त्यावर नागरिक, विद्यार्थी, चित्रकार, हौशी व्यक्ती यांनी विविध रंगाच्या पेन किंवा ब्रशचा वापर करुन देशाच्या ‘स्वातंत्र्या बाबतच्या आपल्या भावना’ त्यावर व्यक्त करावयाच्या आहेत. यात परंपरा व संस्कृतीनुसार विविध पेंटींग व कलरचा उपयोग चित्रकार, विद्यार्थी व नागरिकांनी चित्र, वाक्ये किंवा स्लोगन करने अपेक्षित आहे. फिनले मिलच्या वतीने आवश्यक सामुग्री जसे. स्केच पेन, पेंट, ब्रश व डाय इत्यादी साहित्य उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
‘कलर्स ऑफ इंडिपेंडन्स’ सप्ताहानिमित्त दररोज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.10 ऑगस्ट रोजी राजकमल चौक येथे दुपारी 12 ते रात्री 8 वाजेपर्यत., दि.11 व 12 ऑगस्ट रोजी ई-ऑरबीट (डीमार्ट) येथे सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यत, दि. 13 ऑगस्ट रोजी पंचवटी चौक येथे सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यत, दि. 14 ऑगस्ट रोजी सांस्कृतिक भवन येथे सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यत तथा दि. 15 ऑगस्ट रोजी जिल्हा स्टेडियम येथे सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यत नागरीक, विद्यार्थी, चित्रकार येथे लावण्यात येणाऱ्या खादीच्या कापडावर संदेश लिहु शकतील.
                                                                        00000

कोल्हे/झिमटे/दि.09-08-2016/5.05 वाजता

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती