Thursday, August 11, 2016



जलजन्य व किटकजन्य आजारांवर तातडीने उपाय करा
जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आरोग्य अधिकाऱ्यांचा आढावा
          अमरावती, दि.11 (जिमाका) : जलजन्य व किटकजन्य आजार जसे डेंग्यू, मलेरीया, कॉलरा, गॅस्ट्रो यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव पावसाळ्यात खुप जास्त प्रमाणावर जाणवतो. या पार्श्वभूमीवर सततच्या ढगाळ वातावरणामुळे व पावसामुळे आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी आज घेतलेल्या आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत दिले.
बैठकीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. तरोडेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी  कार्यालयाच्या वतीने डॉ. माने, महानगर पालिका आरोग्य अधिकारी डॉ. सीमा नेताम यासह आरोग्य यंत्रणेचे सर्व वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी डॉ. अरुण राऊत यांनी स्वाईन फ्ल्यु रोगामुळे जानेवारी 2015 ते डिसेंबर 2015 या वर्षात 7 हजार 641 रुग्णांची तपासणी करण्यात आली. यापैकी 234 रुग्णांना उपचारार्थ दाखल करण्यात आले. 122 रुग्णांचे स्वॉब तपासणी करण्यात आली. यापैकी 31 स्वॉब संक्रमित निघाले. स्वाईन फ्ल्युमुळे जिल्ह्यात एकही मृत्यु झालेला नाही. तसेच जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. तरोडेकर यांनी डेंग्यू, मलेरियाचा प्रादुर्भाव असणारी 49 जोखीमीची गावे असल्याची माहिती दिली. डेंग्यू व मलेरिया प्रतिबंधासाठी फवारणी, गप्पी मासे सोडणे, कोरडा दिवस पाळण्याचे प्रतिबंधात्मक उपाय सुरु केले आहे. यासाठी दोन चमु तयार करण्यात आल्या आहेत.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. माने यांनी जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभागाचा आढावा दिला. त्यामध्ये 14 तालुक्यात 14 पथके व प्राथमिक आरोग्य केंद्रावर 56 पथके तयार करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली व जिल्हा स्तरावर शीघ्र प्रतिसाद पथकाची देखील स्थापना करण्यात आली आहे. वरुड भागातुन पंचमढी यात्रेला जाऊन परत आलेल्या लोकांना हिवताप विषयक प्रतिबंधात्मक औषधोपचार करण्यात येतील, असे ही त्यांनी यावेळी सांगीतले.
पावसामुळे होणाऱ्या आजारांविषयी आरोग्य यंत्रणेने सतर्क राहावे. तालुका स्तरावर आरोग्य यंत्रणांची आढावा बैठक घ्यावी. औषध पुरवठा वेळेत करावा. फवारणी करावी व नागरिकांनी देखील दुषित पाण्यांच्या आजारापासुन बचावासाठी योग्य तो काळजी घ्यावी, असे आवाहन बैठकीच्या माध्यमातुन करण्यात आले.
         
00000
वाघ/कोल्हे/दि.11-08-2016/2-30 वाजता


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...