महिला ही अबला नसुन सबला आहे- व्यंकटेश राठोड
अचलपुर येथे
महसुल ग्राम महिला सप्ताह साजरा
       अमरावती, दि.6 (जिमाका) : महिला ही अबला नसुन सबला आहेत. त्यामुळे आपल्या मनात असलेल्या लाचारीचा विचार काढुन टाकावा व महिलांनी सर्व क्षेत्रात प्रवेश करुन क्षेत्रात नेत्रदिपक कामगीरी करावी, असे उदगार अचलपुरचे उपविभागीय अधिकारी व्यंकटेश राठोड यांनी काढले.
लोकाभिमुख घटक महाराष्ट्र शासनातर्फे महसुल प्रशासन व शासनाचे सर्व विभाग अधिक लोकाभिमुख गतीमान होण्यासाठी महाराजस्व अभियान 2016 अंतर्गत अचलपुर येथे महसुल ग्राम महिला सप्ताह दि. 1 ऑगस्ट 16 रोजी कल्याण मंडपम सभागृह येथे घेण्यात आला. यावेळी ते महिला सबलीकरण व सशक्तीकरण याविषयी मार्गदर्शन करतांना बोलत होते. त्यांनी महसुल विभागातील स्त्रियांविषयी कायद्यासंबंधी माहिती दिली तसेच महसुल ग्राम महिला सप्ताह कार्यक्रम दि. 1 ते 7 ऑगस्ट 2016 या कालावधीत महसुल विभागामार्फत संपुर्ण तालुक्यामध्ये राबविण्यात येत असुन त्यामध्ये महिलांनी सदर योजनेचा लाभ घेण्याबाबत आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी अचलपुरचे उपविभागीय अधिकारी व्येंकटेश राठोड, तहसीलदार मनोज लोणारकर, पोलिस उपनिरीक्षक ठाकरे. मॅडम, आढे मॅडम, नगरसेविका श्रीमती विधडे, श्रीमती उईके, श्रीमती मुघल, पत्रकार रुपाली बुले उपस्थित होते. या कार्यक्रमास एकुण 7 विभागाने भाग घेतला व विविध योजनेच्या महितीचे निर्गमन केले.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार मनोज लोणारकर यांनी केले. आपल्या प्रास्ताविक भाषणात त्यांनी महाराजस्व अभियान अंतर्गत महसुल महिला सप्ताहाचे उद्देश व उदिष्ट याबाबत विस्तारीत माहिती दिली तसेच महिलांसाठी असलेल्या कायद्यांविषयी माहिती दिली. सर्व महिलांनी एकमेकांसोबत चर्चा करुन विविध महिलांविषयीच्या योजनांबाबत माहिती मिळावला पाहिजे याबाबत मार्गदर्शन केलेते.
            पोलीस उपनिरिक्षक आढे मॅडम, ठाकरे मॅडम यांनी पोलीस विभागातील महिलांकरिता असलेल्या काद्याबाबत व महिला सुरक्षिततेबाबत माहिती देऊन भारतीय दंड संहितामधील काद्यामध्ये कोणकोणत्या बाबी नमुद केल्या आहे. त्याबाबत मार्गदर्शन केले. त्यानंतर तालुका कृषि अधिकारी सातव यांनी कृषि विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या महिला विषयक विविध योजनांची माहिती देऊन सदर योजनेचा लाभ हा महिला खातेदार तसेच इतर सर्व संबंधित महिलांनी सुद्धा घ्यावा, असे आवाहन केले. नगरसेविका श्रीमती विधडे यांनी मुलीच्या सुरक्षिततेविषयी तसेच विविध महिलाविषयक बाबींवर तसेच अचलपुर तालुक्याने संजय गांधी निराधार योजनेतंर्गत निराधार महिलांना धनादेशाचे वाटप करण्यात आले व ऑनलाईन 7/12 चे सुद्धा महिला खातेदारांना वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आभार प्रांजली गावंडे ने मानले.
                                                                        00000

काचावार/कोल्हे/दि.06-08-2016/8.00 वाजता

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती