स्तनपानविषयक जनजागृतीसाठी
परिचारिका संवर्गातील नवीन पिढी तयार करणे आवश्यक-डॉ. अरुण राऊत
जागतिक स्तनपान सप्ताह साजरा
            अमरावती, दि.02 : जिल्ह्यात बालमृत्यु आणि कुपोषणाचे सावट आहे. या समस्यांवर परिणामकारकरित्या नियंत्रण व प्रतिबंधासाठी स्तनपान अतिशय आवश्यक आहे. स्तनपान विषयक सप्ताहांच्या माध्यमातुन 25 मातांना दिलेला संदेश समाजात नेण्यास उपयोग ठरेल. त्याचबरोबर या कार्यासाठी परिचारिका संवर्गातील नवीन पिढी तयार करणे आवश्यक आहे. तेव्हाच स्तनपान विषयक जनजागृतीसाठी मदत होईल, असे विचार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत यांनी व्यक्त केले.
            परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालयस आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, स्त्री रोग व प्रसुतिशास्त्र तज्ञ व बालरोग तज्ञ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम राबवून जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
सप्ताहाच्या आयोजना दरम्यान आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. आसोले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भालेराव, जिल्हा स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. वारे प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. आसोले यांनी आपण महाराष्ट्राचा दर हजारी 22 एवढा अर्भक मृत्युदर 18 पेक्षा कमी करु शकतो. त्यासाठी स्तनपान उपयुक्त असल्याचे सांगितले. समाजाचा सहभाग, शासकिय व खाजगी संस्थंचे आरोग्यासाठी एकित्रत काम करणे व आरोग्य शिक्षण याद्वारे समाजाला उत्तम आरोग्य मिळणे सहज शक्य होते. असे विचार डॉ. भालेराव यांनी व्यक्त केले.
याशिवाय कार्यक्रमाच्या निमित्ताने सामान्य, स्त्री, संदर्भ सेवा हे तीनही रुग्णालय, प्रशिक्षण महाविद्यालय, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र व स्त्री रोग व प्रसुतिशास्त्र तज्ञ व बालरोग तज्ञ संघटना एकत्रित आल्या याबद्दल त्यांचे मान्यवरांच्या वतीने कौतुक करण्यात आले. डॉ. वारे यांनी ‘कांगारु पद्धतीविषयीची माहिती’ दिली.  
‘स्तनपान- शाश्वत विकासाची किल्ली’ या 2016 च्या घोषवाक्यानुसार 1 ते 7 ऑगस्ट हा जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त स्तनपानविषयक प्रबोधन व प्रशिक्षण यांची सुशिक्षीत व उच्चभ्रू समाजाची गरज लक्षात घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्या तारा शर्मा यांनी प्रशिक्षणार्थींसाठी निबंध, स्पॉट स्पीच, रांगोळी, पोस्टर्सस्लोगन स्पर्धांचे आयोजन कक्ष क्र. 5 (बालरुग्ण) येथे केले होते. यावेळी संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. निकम, विकृतीशास्त्र तज्ञ डॉ. जाधव, डॉ. बोके, डॉ. कुथे, स्त्री रोग व प्रसुतिशास्त्र तज्ञ संघटनेच्या डॉ. प्रांजल, बालरोग तज्ञ संघटनेचे डॉ. सवई, डॉ. तिवारी, डॉ. अभयर राठोड, डॉ. नागलकर, डॉ. दानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन डांगे, प्रस्तावना श्रीमती अटाळकर, स्पर्धांचे निकाल श्रीमती राठोड यांनी घोषित केले. कार्य्रक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती घाटे, श्रीमती निंबोरकर, श्रीमती सोनार, श्रीमती गजभिये, श्रीमती खोडके, प्रशिक्षणार्थींनी व बालरुग्ण कक्ष परिचारिका संवर्गांनी केले.

                                                00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती