भारतीय स्वातंत्र्याचा 69 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा
पालकमंत्री प्रविण पोटे यांच्याहस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
शेतकरी केंद्रबिंदु मानुन शासनाची भरीव कामगिरी  
          अमरावती, दि.15 (जिमाका) : भारतीय स्वातंत्र्याचा 69 वा वर्धापन दिनानिमित्त आज विभागीय आयुक्त कार्यालय येथे मुख्य शासकीय ध्वजारोहन पालकमंत्री प्रविण पोटे यांच्याहस्ते संपन्न झाले. त्यानंतर राष्ट्रगीत व मानवंदना देण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, विशेष पोलिस महानिरीक्षक विठ्ठल जाधव, पोलिस अधिक्षक ग्रामीण लखमी गौतम उपस्थित होते.
          यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील विकासपर कामांवर प्रकाश टाकला. त्यामध्ये प्रामुख्याने जलयुक्त शिवार अभियान हे शेतकऱ्यांसाठी संजिवनी ठरले असुन जिल्ह्यातील 253 गावांमध्ये 33703 टिएमसी जलसाठा निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. 253 पैकी 127 गावांना 100 टक्के जलयुक्त घोषित करण्यात आले आहे. राज्य शासनाने शेतकऱ्याला केंद्र बिंदू मानून अनेक योजना यशस्वीरित्या राबवित आहे. त्यामध्ये पांदन रस्ते विकास योजनेतून 985 किलोमीटर पांदण रस्ते निर्माण झाले आहे. लोकसहभागातून या कामासाठी 7 कोटी तर रोजगार हमी योजनेतून 32 कोटी खर्च करण्यात आले आहे.या कार्यक्रमाचे महत्व लक्षात घेता हा अमरावती पॅटर्न राज्याच्या इतर भागातही राबविण्याचा शासनाचा मानस आहे.  राज्यात मागेल त्याला शेततळे ही योजना लोकप्रिय ठरली असुन या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामध्ये 3159 शेतकऱ्यांनी मागणी केली असुन 363 शेततळे पहिल्या तीन महिन्यात पुर्ण करण्यात आले आहे.
    टेक्सटाईल पार्कमध्ये आलेल्या वस्त्रोद्योग कंपन्यामुळे जिल्ह्यात उद्योग विकासाची नांदी होत आहे. जिल्ह्याचे सुपुत्र व उत्कृष्ट संसदपटू रा.सु.गवई यांचे भव्य स्मारक लवकरच साकारणार आहे. या स्मारकाचे भुमीपुजन नुकतेच विद्यापीठ परीसरात झाले आहे. शहरातील रस्ते व पुलाकरीता सिआरएफ फंडातुन निधी उपलब्ध झाल्याचेही त्यांनी सांगीतले.
          पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ 2 लक्ष 16 हजार शेतकऱ्यांना दिला गेला आहे. यासोबतच प्रधानमंत्री आवास योजना, पीक कर्ज वाटप, कृषि समृद्धी महामार्ग, माझी कन्या भाग्यश्री आदी  योजनांचा प्रगतीपर संक्षिप्त आढावा त्यांनी मांडला.  
          यानंतर कृषि समृद्धी समन्वयीत कृषि विकास प्रकल्प तर्फे प्रकाशित कृषि समृद्धी यशोगाथा या पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उल्लेखनीय काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. पोलिस आयुक्त शहर विभागातील शारदाचरण हरीनारायण तिवारी यांना 2016 करीता गुणवत्ता सेवेबद्दल मा.राष्ट्रपती भारत सरकारद्वारे आयपीएम पदक प्रदान करण्यात आले त्याबाबत प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले. यामध्ये पी.के.देवरणकर, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परिक्षेतील गुणवंत ऋषिल हेडा, खुशबु हेडा, आयएसओ अंतर्गत उत्कृष्ट काम केल्याबद्दल ग्राम पंचायत चेनुष्टा व वऱ्हा येथील सरपंच व सचीव पुजा आमले, गणेश कांबळी यांचा सत्कार करण्यात आला तर माझी कन्या योजनेंतर्गत कन्यारत्न जन्माला आलेल्या जोडप्यांचा प्रशस्ती पत्र देवून सत्कार करण्यात आला. त्यामध्ये सौ.निकिता गौरकर, सौ.रोशनी पेठेकर, सौ.प्रियंका सराफ, सौ.अंकिता येवतकर, सौ.सोनाली धनसांडे. मौजा काटसुर, ता.तिवसा व मौजा लासुर, ता.दर्यापूर येथे पुरामध्ये अडकलेल्या नागरीकांना सुखरुप काढण्याच्या बचाव कार्याबद्दल तहसिलदार राम लंके व चमू व तहसिलदार राहुल तायडे व चमू यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दि.28 जुन, 16 रोजी टारखेडा येथील गुटखा साठा जप्त करुन त्याची विल्हेवाट लावण्याबाबत तहसिलदार अमरावती सुरेश बगळे यांचा सत्कार करण्यात आला.
          ध्वजारोहण झाल्यानंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.   
          यावेळी आमदार डॉ. अनिल बोंडे, डॉ.राजेन्द्र गवई, मनपा आयुक्त हेमंत पवार यासह सर्व विभागाचे महत्वाचे अधीकारी नागरीक उपस्थित होते.
00000

वाघ/गावंडे/सागर/झिमटे/हरदुले/15-08-2016/12-51 वाजता







Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती