गणेशोत्सव वर्गणीसाठी ऑनलाईन अर्ज करावे
       अमरावती, दि.6 : सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 च्या कलम 41 क प्रमाणे श्री गणेशोत्सव कार्यक्रमासाठी वर्गणी जमा करुन तात्पुरत्या स्वरुपात उत्सव साजरा करण्याकरीता ऑनलाईन अर्ज स्विकारण्यात येत आहेत. दि. 1 ऑगस्ट पासुन गणेशोत्सव मंडळांकडुन या संदर्भात ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येत असुन परवानगी ही ऑनलाईन देण्यात येतील. त्याकरीता charity.maharashtra.gov.in या वेबसाईट वर लॉगीन करावे, असे अधीक्षक, सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, अमरावती यांनी कळविले आहे.
                                                          00000

वृत्त क्र.822                                                         दिनांक 06-08-2016
नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी सुरु
       अमरावती, दि.06 : नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी दि. 8 ते 10 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. नोंदणी करीता येणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा खर्च दिला जाणार नाही. नोंदणी करीता येणाऱ्या उमेदवारांची नाव नोंदणी प्रक्रिया सुलभ व्हावी यादृष्टिने उमेदवारांची पथक निहाय तारखेस नाव नोंदणी व शारीरिक चाचणी होणार आहे. तरी उमेदवारांनी होमगार्ड जिल्हा प्रशिक्षण केंद्र, कांग्रेस नगर रोड येथे पुढील तारखेस हजर व्हावे.
          अमरावती दि. 8 ऑगस्ट सकाळी 8 वाजेपासुन., अचलपुर, दर्यापुर तथा धारणी दि. 9 ऑगस्ट सकाळी 8 वाजेपासून., चांदुर रेल्वे, मोर्शी 10 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजेपासुन., तरी उमेदवारांनी वर निर्धारित केलेल्या तारखांना नाव नोंदणी करीता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड यांनी केले आहे.
                                                00000
   
 वृत्त क्र.823                                                         दिनांक 06-08-2016

अन्न व औषध प्रशासनातर्फे
2 लक्ष 92 हजाराचा प्रतिबंधित अन्न साठा जप्त
अमरावती, दि.6 : अन्न व औषध प्रशासनातर्फे जिल्ह्यातील विविध तालुक्यात प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या जप्तीची कारवाई काल दि. 5 ऑगस्ट रोजी करण्यात आली. त्यामध्ये एकुण 2 लक्ष 92 हजार 719 रुपये किंमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा अन्न सुरक्षा मानदे कायद्यांतर्गत जप्त करण्यात आला. यामध्ये मालानी मार्केटींग दर्यापुर यांचे कडे 3 हजार 360 रुपये, राज मार्केटींग बनोसा यांचे कडे 11 हजार 970 रुपये, के.जी.एन कंफेश्नरी 4500 रुपये, प्रमोद अग्रवाल शनिवाडा अंजनगाव सुर्जी 19 हजार 100 रुपये, मो. अमीन मो. इसाक शरीफ यांचे गोडाऊन चांदुर रेल्वे रोड, नांदगाव खंडेश्वर 2 लक्ष 1 हजार 29 रुपये, राजेश ड्रायफुड चांदुर रेल्वे 2 हजार 325 रुपये, गणेश माहुलकर 7 हजार 25 रुपये, विजय ट्रेडर्स वरुड 27 हजार 940 रुपये तसेच नॅशनल एग सेंटर वरुड 15 हजार 470 रुपये ऐवढ्या किंमतीच्या अन्न पदार्थांची जप्ती करण्यात आली. या कारवाई मध्ये शशीकांत केकरे सह आयुक्त व मिलींद देशपांडे यांचे मार्गदर्शनाखाली ही कारवाइ करण्यात आली.
नागरिकांनी प्रतिबंधित अन्न पदार्थांच्या साठ्याबाबत माहिती असल्यास 0721-2665891 या दुरध्वनी क्रमांकावर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.   
                                                00000
वाघ/कोल्हे/दि.06-08-2016/15.51 वाज

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती