ऑटोरिक्षांचे शहरी व ग्रामीण भागातील वाहन ओळखण्याकरीता
वाहनावर मागे व पुढे पांढऱ्या अक्षरात ‘अमरावती झोन’ लिहिणे आवश्यक
       अमरावती, दि. 02 : प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, अमरावती येथे दि.04 एप्रिल, 2006 चे सभेत झालेल्या निर्णयानुसार शहरी व ग्रामीण भागातील ऑटोरिक्षा वाहन ओळखण्याकरीता ऑटोरिक्षाच्या मागे व पुढे पांढऱ्या मोठ्या अक्षरात ठळकपणे ‘अमरावती झोन’ असे शब्द रंगविण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. अमरावती जिल्ह्यातील अमरावती झोन क्षेत्रात ऑटोरिक्षा चालवण्यासाठी वैध परवाना असलेल्या रिक्षा चालकांना ही सूचना देण्यात आली होती. त्यानुसार जे ऑटोरिक्षा चालक अशापद्धतीने शब्द रंगविणार नाही, त्यांच्या विरुद्ध परवान्याच्या शर्तीचा भंग म्हणून कडक कार्यवाही केली जाईल, असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
          विभागाच्या वतीने अमरावती झोन मधील ऑटोरिक्षा धारकांना दिलेल्या सूचनेनुसार त्यांना प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, अमरावती यांचे ठरावाप्रमाणे ऑटोरिक्षाच्या मागे व पुढे पांढऱ्या अक्षरात ठळकपणे अमरावती झोन असे शब्द रंगविणे आवश्यक आहे. तसेच अमरावती झोन शिवाय अन्य झोनच्या ऑटोरिक्षा चालकांनी अमरावती शहरात वाहतुक करण्यास बंदी केली आहे. त्यामुळे अमरावती झोन व्यतिरिक्त असलेल्या ऑटोरिक्षा चालकांनी शहरात येऊ नये, अन्यथा परवान्याच्या शर्तीचा भंग केल्याने कडक कारवाई केली जाईल, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
वृत्त क्र.799                                                                     दिनांक 01-08-2016
16 वर्षाची कोमल श्रीकृष्ण सवई बेपत्ता
            अमरावती, दि. 21 : पोलिस आयुक्तालय अमरावती, शहर पोलिस ठाणे फेजरपुरा हद्दीतील कु. कोमल श्रीकृष्ण सवई ही राहणार व्यंकैयापुरा, अमरावती दि.19 मार्च, 16 रोजी 17-30 वाजता घरी कोणालाही न सांगता निघुन गेली व परत आली नाही. पोलिस ठाणे फेजरपुरा येथे दि.20 मार्च, 16 रोजी अप क्र 211/2016 कलम 363 भा.द.वि. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्यापर्यंत तिचा शोध लागला नाही, असे सहा.पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, अमरावती शहर यांनी कळविले आहे.
            बेपत्ता कोमल सवई ही 16 वर्षाची असुन तिची उंची 5 फुट 3 इंच आहे. तिचा रंग सवळा, बांधा सडपातळ, कपडे गुलाबी रंगाचे सलवार सुट, काळ्या रंगाची कॉलेज बॅग आहे. ज्या कोणाला ह्या मुलीबाबत काही माहिती सांगावयाचे असल्यास किंवा शोध लागला तर पोलिस स्टेशन  फेजरपुरा येथे 0721-2552600 या क्रमांकावर किंवा नियंत्रण कक्ष अमरावती शहर येथे 0721-2551000 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन गुन्हे शाखा, अमरावती शहराचे सहायक पोलीस आयुक्त यांनी केले आहे.
                                                                        00000


वृत्त क्र.800                                                         दिनांक 01-08-2016
जागतिक स्तनपान सप्ताहनिमित्त विविध कार्यक्रम  
       अमरावती, दि.02 : स्त्री रोग व प्रसुती शास्त्रज्ञ संघटना अमरावती, परीचर्या प्रशिक्षण महाविद्यालय जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हा स्त्री रुग्णालय अमरावती आणि आरोग्य कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त  दि.1 ऑगस्ट ते दि.7 ऑगस्ट, 16 मध्ये विविध कार्यक्रमांद्वारे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक स्तनपान सप्ताहाचे घोषवाक्य ‘स्तनपान शाश्वत विकासाची किल्ली’ या भोवती या दिनाचे कार्यक्रम केंद्रीत करण्यात आले आहे.
          जनजागृतीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी वैयक्तिक, सामाजिक व शासकीय पातळीवर जबाबदारी घेवून जागरुक राहणे आवश्यक आहे. हा संदेश जागतिक स्तनापन सप्ताहाच्या माध्यमातून दिला जाणार आहे. यानिमित्त दि.03 ऑगस्ट, 16 रोजी सकाळी 10 वाजता संदर्भ सेवा रुग्णालय (सुपरस्पेशालिटी) अमरावती येथे पोस्टर, स्लोगन प्रदर्शनी, दि.05 ऑगस्ट, 16 रोजी सकाळी 9 वाजता डफरीन हॉस्पिटल अमरावती येथे प्रभात फेरी प्रारंभ होणार आहे, अशी माहिती सामान्य रुग्णालय अमरावती परीचर्या प्रशिक्षण महाविद्यालयाच्या प्राचार्या कु.तारा डी.शर्मा आणि अनिता राठोड यांनी कळविली आहे.
                                                00000


जागतिक स्तनपान सप्ताह निमित्ताने कविता
ऐका हो ऐका सर्वजण ऐका,
माता पित्यांनी तुम्ही सर्व ऐका ….
पहिल्या दिवशी चिकदुध बाळा तु पितो
पहिले लसीकरण तुला मी देतो
स्तनपानासाठी जवळघेत तुला आई
ऊबदार ठेवून झोप तुला येई
ऐका हो ऐका….
स्तनपान आहे अमृत बाळाचे,
 भविष्यात आधारस्तंभ तु देशाचे
ऐका हो ऐका…
भागे तहान भुक सहा महिने बाळाची
कष्ट, पैसा, वेळ नाही लागत हो तुमची
ऐका हो ऐका…
स्तनपानातून मिळते शक्ती ह्दयाला
बाळ होतो यशस्वी प्रत्येक पाऊलाला
ऐका हो ऐका…
संसर्गप्रतिबंधक शक्ती मिळे तुला बाळा,
अतिसार, गोवर, श्वसनदाहानी नाही होत बाळ
ऐका हो ऐका …
या बाळाने दिला तुम्हाला मातृत्व
करा तुमच्या निव्वळ स्तनपानाने त्याला उपकृत
ऐका हो ऐका…
सुडौल बांधा, पाळणा लांबविणे हीच स्तनपानाची निती
सुटलेले पोट, अंवाच्छित गर्भाची नाही राहणार तुम्हाला हो भिती
ऐका हो ऐका…
स्तनदा मातेनेही रहावे गुटगुटीत
बाळालाही निरोगी काया मिळे घुसघुशित
ऐका हो ऐका…
आनंद, वात्सल्य आपुलकिचे हे बंधन
जाणवेल तुमच्या घराला मायेचे स्पंदन
ऐका हो ऐका…
आर्थिक विपदा, आतंकवाद माजलाय देशात अफाट
माँ का दुध पिया बालक पळवितो या संकटांना सुसाट
ऐका हो ऐका सर्वजण ऐका
माता पित्यांनी तुम्ही सर्व ऐका

कु.तारा शर्मा
प्राचार्या,
 परीचर्या प्रशिक्षण महाविद्यालय,
सामान्य रुग्णालय, अमरावती
7507211517


00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती