अपघात टाळण्यासाठी सतर्कता महत्वाची - पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर


अपघात टाळण्यासाठी सतर्कता महत्वाची
-         पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर
अमरावती, दि. 4 : अपघातामुळे केवळ व्यक्तीची नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाची वाताहत होते. त्यामुळे वाहन चालविताना व्यक्तीने सजग व सतर्क असणे आवश्यक असल्याचे पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी सांगितले.
परिवहन विभागातर्फे 30 व्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. पोलीस अधिक्षक दिलीप झळके, उपजिल्हाधिकारी अजय लहाने, प्रादेशिक परिवहन अधिकारी राजाभाऊ गीते, सार्वजनिक बांधकाम अभियंता विभावरी वैद्य आदी उपस्थित होते.
श्री. बाविस्कर म्हणाले की, तरुण पिढीने वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवले पाहिजे. पोलीसांना वाहतूक नियमांसाठी सहकार्य केले पाहिजे. वाहतूक नियम मोडल्यास एखाद्या व्यक्तीवर पोलीसाने कारवाई केली तर त्यालाच रोषाला बळी पडावे लागते. तसे घडू नये. अपघातविरहित सेवा देणा-या वाहनचालकांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत देशमुख यांनी आभार मानले. श्वेता वैद्य यांनी सूत्रसंचालन केले.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती