पालकमंत्र्यांकडून विविध उद्योगांचा आढावा विविध कल्याणकारी योजनांचा लाभ कामगारांना मिळवून द्यावा - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

    



अमरावती, दि. 30 : वस्त्रोद्योग पार्कच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठे प्रकल्प सुरु झाले व पुढील काळातही होणार आहेत. त्यामुळे मोठी मनुष्यबळ निर्मिती होणार आहे. कामगार बांधवांच्या कल्याणासाठीही शासनाने अनेकविध योजना लागू केल्या असून, त्यांना त्यांचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश उद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे दिले.
            औद्योगिक वसाहतीतील विविध उद्योग व संबंधित विविध बाबींचा आढावा पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह उद्योग विभाग, कामगार विभाग व विविध उद्योगांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.  
            श्री. पोटे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनाने मेक इन महाराष्ट्रच्या माध्यमातून  उद्योगांचा विकास घडवून आणला. अमरावतीतही वस्त्रोद्योग पार्कमधून अनेक नामांकित कंपन्यांचे प्रकल्प सुरु झाले. भविष्यातही अनेक प्रकल्प सुरू होणार आहेत. मोठी मनुष्यबळनिर्मितीही होणार आहे. त्यादृष्टीने उद्योगांनीही कामगार बांधवांसाठीच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करावे. कंपनी वेतन देताना मध्यस्थी टाळावी. कंपनी जेवढे वेतन देते, ते कामगारांना मिळालेच पाहिजे. कामगारांना वेतन कंपनीकडून थेट द्यावे. कुणाही कामगाराला निष्कारण नोकरीवरून काढून टाकू नये. नियमांचे पालन करावे. मनुष्यबळ भरतीसाठी मेळावे घ्यावे. उद्योग व कामगार विभागानेही समन्वय ठेवून कामे करावीत, तसेच  कुशल व अकुशल कामगारांची यादी सादर करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती