Wednesday, March 20, 2024

हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन (मिलिंद मधुसुदन रितोवा)

 


हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन (मिलिंद मधुसुदन रितोवा)

 

            अमरावती, दि. 20 (जिमाका) :  येथील  मिलिंद मधुसुदन रितोवा  (वय 30 वर्षे, रा. भाजीबाजार, खोलापुरी गेट, अमरावती) ही व्यक्ती हरविल्याची फिर्याद खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

 

मिलिंद मधुसुदन रितोवा  हे दि. 05 फेब्रुवारी, 2024 रोजी सायंकाळी 5 वाजता भाजीबाजार, खोलापुरी गेट येथून बाहेर जातो असे सांगुन घरून निघुन गेला आहे. शोध घेतला असता ते सापडले नाहीत.  त्यांचा वर्ण सावळा, उंची पाच फूट 1 इंच, बांधा मजबूत, उजव्या हातावर फुल गोंदलेले. दाढी वाढलेली  घरून जातेवेळी  अंगात पांढरा शर्ट त्यावर फुलाचे चित्र, निळा रंगाचा जिन्स पॅन्ट, घातलेले होते.

 

          उपरोक्त वर्णनाची व्यक्ती कुणालाआढळल्यास त्यांनी खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात (0721)-2678133  या दूरध्वनी क्रमांकावर किंवा विनोद टेंभुणै 9588467307 किंवा पोलीस निरीक्षक स्वाती पवार 7768004999 या मोबाईल क्रमांकावर  यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन खोलापुरी गेट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.

00000

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...