निवडणूक खर्च निरीक्षकांनी खर्च पथक व माध्यम कक्षाला दिली भेट; निवडणूक खर्च संबंधित यंत्रणेचा घेतला आढावा

 






निवडणूक खर्च निरीक्षकांनी खर्च पथक व माध्यम कक्षाला दिली भेट;

निवडणूक खर्च संबंधित यंत्रणेचा घेतला आढावा

अमरावती, दि. 29 (जिमाका): लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी अमरावती मतदार संघांकरिता निवडणूक खर्च निरीक्षक म्हणून अनुप कुमार वर्मा यांची नियुक्ती केली आहे. श्री. वर्मा यांनी खर्च विषयाशी संबंधित यंत्रणेचा आढावा निवडणूक खर्च कक्ष येथे घेतला. तसेच निवडणूक खर्च व माध्यम कक्षाला भेट देऊन निवडणूक संदर्भातील खर्च व्यवस्थापन वेळीच व योग्य प्रकारे करण्याच्या सुचना त्यांनी  दिल्या.

खर्च  निरीक्षक श्री. वर्मा हे मतदार संघात तिन वेळा भेटी देणार असून प्रथम भेटीसाठी गुरुवार  दि. 28 रोजी जिल्ह्यात दाखल झाले. दरम्यान आज सकाळी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या सोबत निवडणुक संबंधित कामकाजाचा आढावा घेतला. त्यानंतर सर्व सहायक निवडणूक अधिकारी व नोडल अधिकाऱ्यांकडून निवडणूकीच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची माहिती घेतली. उमेदवाराकडून प्रचारासाठी केल्या जाणाऱ्या प्रत्येक खर्चाची काटेकोरपणे नोंद घ्यावी. निवडणूक आयोगाच्या निर्देश व सूचनांचा कुठेही भंग होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे निर्देश खर्च निरीक्षकांनी दिले.

निवडणूक खर्च संनियंत्रणासाठी लेखा पथके, निरीक्षण पथके, भरारी पथके, व्हिडीओ देखरेख पथके, तसेच लेखा, कॅश, बँक रजिस्टर, माध्यम खर्च संनियंत्रण अहवाल, प्राप्तीकर विभाग, तसेच बँकांकडून प्राप्त अहवाल आदींबाबत माहिती खर्च निरीक्षकांनी यावेळी यंत्रणेकडून घेतली. यावेळी खर्च संनियंत्रक नोडल अधिकारी तथा मुख्य लेखा वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे, सहायक नोडल अधिकारी विजय देशमुख, सहायक संचालक दिनेश मेटकर, आयकर विभागाचे नोडल अधिकारी रविंद्र सोनी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नोडल अधिकारी ज्ञानेश्वरी अहिरे आदी उपस्थित होते. 

नागरिकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी राहणार उपलब्ध : निवडणूक खर्च निरीक्षक अनुप कुमार वर्मा यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8830850950 असा आहे. तसेच मतदारसंघात कुठेही आचारसंहितेचा भंग होत असल्यास किंवा उमेदवारांच्या खर्चाबाबत माहिती द्यावयाची असल्यास राजकीय पक्ष अथवा नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. श्री. वर्मा यांचे संपर्क अधिकारी म्हणून  प्रमोद पालवे असून त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 7588687208 असा आहे.

 

 निवडणूक निरीक्षक यांची बहिरम येथील चेकपोस्टला भेट

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमेवर असलेल्या  बहिरम येथील चेकपोस्टला श्री. वर्मा यांनी भेट देऊन कामकाजाची पाहणी केली. प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनांची कडक तपासणी झाली पाहिजे. यात कोणताही  निष्काळजीपणा करू नये. चारचाकी  वाहनाच्या डिक्की सह वाहनाच्या सीट जवळील भागसुद्धा तपासावा. काही आक्षेपार्ह आढळल्यास त्याबाबत संबंधित यंत्रणेला माहिती द्यावी, असे निर्देश निवडणूक निरीक्षक श्री. वर्मा यांनी यावेळी दिले. त्यानंतर सहायक निवडणूक निर्णय  अधिकारी, अचलपूर यांच्या कार्यालयाला भेट देऊन निवडणुक कामकाजाचा आढावा घेतला.

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती