जिल्हास्तरीय युवा संसद; विवेकवादी समाज निर्मितीसाठी नेहरु युवा क्रेंद्र उत्तम व्यासपिठ- खासदार डॉ. अनिल बोंडे

 






जिल्हास्तरीय युवा संसद; विवेकवादी समाज निर्मितीसाठी नेहरु युवा क्रेंद्र

उत्तम व्यासपिठ- खासदार डॉ. अनिल बोंडे

 

अमरावती, दि. 12 (जिमाका) : संवेदनशील, विवेकवादी समाज निर्माण करण्याची जबाबदारी आजच्या युवकांवर असून नेहरू युवा केंद्र हे एक उत्तम व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी केले. तसेच युवकांनी सुज्ञ नागरिक म्हणून मतदानाचा हक्क बजावावा असेही आवाहन यावेळी त्यांनी केले.

 

युवा कार्यक्रम एव खेळ मंत्रालयच्या नेहरू युवा केंद्रमार्फत जिल्हास्तरीय युवा संसद कार्यक्रम मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालय येथे नुकताच उत्सहात पार पडला. यावेळी मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख ह्या अध्यक्षस्थानी होत्या. युवा संसदेला मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.प्रशांत विघे, प्रा.सूरज हेरे आणि  सुबोध धुरंधर उपस्थित होते. प्रा. डॉ. प्रशांत विघे यांनी व्होकल फॉर लोकल या विषयावर माहिती देऊन जास्तीत जास्त स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन केले. प्रा. सुरज हेरे यांनी भारतातील नवीन उपक्रम आणि योजनांबद्दल माहिती दिली. सुबोध धुरंधर यांनी नारीशक्ती या विषयावर आपले मत व्यक्त केले. त्याचबरोबर त्यांनी  महिलांसाठी भारत सरकारच्या विविध योजनाची माहिती दिली.

 

जिल्ह्यातील युवकांना संसदीय कार्यप्रणालीची ओळख व्हावी, समाजातील विविध समस्या व्यासपीठावर मांडता यावेत, या उद्देशाने अभिरूप युवा संसदेचे सादरीकरण करण्यात आले. ज्यामध्ये विविध मुद्यांवरती मतं मांडले गेले आणि प्रश्नोत्तर करण्यात आले. जिल्हा युवा अधिकारी स्नेहल बासुतकर यांनी प्रास्ताविक केले. तर भाग्यश्री कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती