जिल्ह्यातील 22 व्यक्ती व 3 संस्थांना सामाजिक न्याय विभागाचे पुरस्कार जाहीर; मुंबईत मुख्यमंत्रीच्या हस्ते आज वितरण

 

जिल्ह्यातील 22 व्यक्ती व 3 संस्थांना सामाजिक न्याय विभागाचे पुरस्कार जाहीर;

मुंबईत मुख्यमंत्रीच्या हस्ते आज वितरण

 

अमरावती, दि. 11 (जिमाका):  जिल्ह्यातील 22 व्यक्ती व 3 संस्थांना सामाजिक न्याय विभागाचे विविध पुरस्कार जाहीर झाले असून त्याचे वितरण उद्या मंगळवार दि. 12 मार्च रोजी मुंबई येथे होणार आहे, अशी माहिती समाजकल्याण सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी दिली.

 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने समाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था व उल्लेखनीय कार्य करणारे समाजसेवक व्यक्ती यांना दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2019-20,2021-22,2022-23 या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या                डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार, कर्मवीर पद्यश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार, संत रविदास पुरस्कार, शाहु, फुले, आंबेडकर पारितोषिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार या विविध पुरस्कारांची शासनाने घोषणा केली आहे. त्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील एकूण 25 त्यामध्ये व्यक्ती 22 व 3 संस्थाचा समावेश आहे. पुरस्कार प्राप्त व्यक्ती वा सस्थांना नॅशनल सेंटर फॉरपर फॉर्मींगआर्टस् जमशेद भाभा नाट्यगृह, एनसीपीएमार्ग, नरीमनपॉइंट, मुंबई येथे 12 मार्च, 2024 रोजी सकाळी 11 वाजता राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचे हस्ते पुरस्कारांचे वितरण होणार आहे.

 

२०१९-२० ते २०२२-२३ वर्षांतील पुरस्कार याप्रमाणे :

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार (व्यक्ती) सन 2020-21 :

1)         कैलास चंद्रभानजी पेंढारकर मु. पो. गोंदनगर विदर्भ मिल अचलपूर,

2)        भरत विनायकराव रेळे मु. पो. विलासनगर अमरावती,

3)        विनोद जयरामजी सर्वटकर रा. जवाहर नगर, पो. व्ही. एम. व्ही. अमरावती,

4)        सौ. चंद्रकांता पंडीतराव भोयर मु. पो. दस्तुरनगर अमरावती,

5)        तुकाराम फकीरजी दहीवाडे रा. बुध्दभूमी जवळ प्रशांत नगर अमरातवी,

6)        कय्युब शाह अय्युब शाह मु. पो. कुरेशी पुरा जामा मस्जीद जवळ वलगांव,

7)        अवधुतराव दौलतराव कुऱ्हाडे मु. पो. लोतवाडा ता. दर्यापूर,

8)        संजय दत्तात्रय वऱ्हेकर रा. रिध्दीसिध्दी अर्पाटमेंट विंग सी. 201 कॅम्प अमरावती,

9)        विनोद नारायणराव गुडधे मु. श्रीकृपा अभियंता कॉलनी व्ही. एम. व्ही. रोड, कठोरा नाका अमरावती,

10)      अनिता शेषराव गवई रा. कैलास नगर दिक्षा प्रोव्हीजन महादेवखोरी अमरावती,

11)       वासुदेव वानखडे मु. पो. 167, न्यु. रविदास कॉलनी कैलासनगर, सुतगिरणी अमरावती. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार (व्यक्ती) सन 2021-22

1)         पंकज ललीतजी ऊर्फ लिलाधर मेश्राम रा. मिसर हॉस्पीटल जवळ, प्रशांत नगर अमरावती,

2)        देवेंद्र ओमप्रकाश खाकसे रा. डॉ. आंबेडकर वार्ड नं. 8 तिवसा,

3)        धनराज देवरावजी चक्रे रा. बालाजी नगर व्ही एम. व्ही रोड, कठोरा रोड, अमरावती,

4)        श्री. नारायणराव भिमराव पडोळे मु. पो. निभी ता. मोर्शी,

5)        रामकृष्ण नशिबराव वाठ रा. शिंदी बु. ता. अचलपूर.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार (संस्था) सन 2021-22

1)         डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वयंसेवाभावी संस्था, लढा प्लॉट नवी वस्ती बडनेरा,

2)        श्री. संताजी बहुउद्येशिय शिक्षण संस्था, गुरूकुंज मु. पो. गुरूकुंज आश्रम ता. तिवसा, अध्यक्ष नित्यानंद रामचंद्र कोल्हे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार (व्यक्ती) सन 2022-23

1)         शिवलाल राजारामजी पवार रा. राजमाता नगर, टोपे नगर जवळ कॅम्प अमरावती,

2)        डॉ. सौ. उज्जवला सुरेशराव मेहरे मु. पो. व्दा. रा. अल्हाद राधानगर अमरावती.

लोकशाही अण्णाभाऊ साठे पुरस्कार (व्यक्ती) सन 2020-21

1)         मोहन शंकरराव खंडारे मु. पो. आसेगांव पुर्णा ता. चांदुरबाजार,

2)        सुधाकर उत्तमराव खडसे मु. पो. दरोगा प्लॉट अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ अमरावती.

लोकशाही अण्णाभाऊ साठे पुरस्कार (व्यक्ती) सन 2021-22

1)         प्रल्हाद माकडाची तायडे मु. पो. देवरी निपाणी ता. भातकुली अमरावती.

लोकशाही अण्णाभाऊ साठे पुरस्कार(व्यक्ती) सन 2022-23

1)         राजाभाऊ जयराम हातागडे मु. चवरे नगर, पो. साईनगर अमरावती.

शाहू फुले आंबेडकर पारिताषिक पुरस्कार (संस्था) सन 2022-23

1)         सर्मपन प्रतिष्ठान सांझाग्राम मालधुर पो. शिरजगांव ता. तिवसा जि. अमरावती.

000000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती