Sunday, June 21, 2020

दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब व्हावा - पालकमंत्री यशोमती ठाकूर


 

अमरावती, दि. 20 : योग हे शारीरिक स्वास्थ्यासह मानसिक स्वास्थ्य व सामाजिक स्वास्थ्यालाही उपयुक्त आहे. त्यामुळे दैनंदिन जीवनात प्रत्येकाने योगाचा अवलंब करावा, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.

योग दिनानिमित्त पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी जिल्ह्यातील समस्त जनतेला शुभेच्छा दिल्या त्या म्हणाल्या की, शरीर व मन यांच्यात संतुलन राखण्याचे कार्य योगाद्वारे होते त्यामुळे निरामय आरोग्य सह शांततामय जीवनासाठी ही योग उपयुक्त आहे. कोरोना संकटकाळात अनेक अडचणी उभ्या राहिलेल्या असताना घरगुती हिंसाचारातही वाढ दिसून आली. या काळात संयमी, खंबीर राहणे आवश्यक आहे. त्यासाठी योगाचा अवलंब प्रत्येकाने करावा, असे आवाहन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी केले. 

 

00000

 


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...