कृषी उद्योजकता निर्मिती व एमपीसी क्षमता विकास कार्यशाळा 27 ऑक्टोबर रोजी

 कृषी उद्योजकता निर्मिती व एमपीसी क्षमता विकास

कार्यशाळा 27 ऑक्टोबर रोजी

      अमरावती, दि. 25 (जिमाका) : महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा), कृषी विद्या विभाग-श्री. शिवाजी कृषी महाविद्यालय, अमरावती व कृषी भूषण महाराष्ट्र एफपीओ स्टार्टअप फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांना व्यवसायात यशस्वी होण्यासाठी ‘कृषी उद्योजकता निर्मिती व एमपीसी क्षमता विकास कार्यशाळा-ॲग्री स्टार्ट-अप कनवेंशन’ डॉ. पंजाबराव देशमुख कृषक प्रशिक्षण केंद्र, श्री. शिवाजी कृषी विद्यान महाविद्यालय, मोर्शी रोड, अमरावती येथे दि. 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता आयोजित करण्यात आलेले आहे.

            या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते होणार असून विभागीय कृषी सहसंचालक किसनजी मुळे, कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी राहणार आहेत. या कार्यशाळेला प्राचार्य श्री शिवाजी कृषी महाविद्यालय नंदकिशोर चिखले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, प्रकल्प संचालक (आत्मा) अर्चना निस्ताने  उपस्थित राहणार आहेत. कार्यशाळेसाठी चेअरमन-कृषी भूषण महाराष्ट्र एफपीओ स्टार्टअप फेडरेशन भूषण निकम, तसेच चेअरमन- कृषी भूषण ग्रोवर्स प्रोड्युसर कंपनी लि. नाशीक, कृषी विद्या विभाग श्री. शिवाजी कृषी महाविद्यालय सहयोगी प्राध्यापक जितेंद्र दुर्गे प्रमुख वक्ते म्हणुन राहणार आहेत.

            या कार्यशाळेसाठी संबंधित शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकल्प संचालक (आत्मा) अर्चना निस्ताने यांनी केले आहे.

000000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती