अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यास महाडीबीटी संकेतस्थळ कार्यान्वित

 अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्तीचे

अर्ज भरण्यास महाडीबीटी संकेतस्थळ कार्यान्वित

            अमरावती, दि. 25 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या वरील विविध शिष्यवृत्ती योजनांचे सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाचे व नुतनीकरणाचे अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी दि. 11 ऑक्टोबर, 2023 पासून महाडीबीटी पोर्टल शासनाकडून सुरू करण्यात आलेले आहे.

            सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सन 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून शासनाच्या महाडीबीटी प्रणालीवर विविध शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येतात. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, व व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना तसेच सन 2022-23 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी स्तरावर असलेले अर्ज विद्यार्थ्यांना रि-अप्लाय करण्यासाठी व महाविद्यालयांना अर्ज पडताळणीसाठी सुध्दा शासनाकडून सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

            सन 2023-24 शैक्षणिक वर्षात महाविद्यालयात प्रवेशित अनुसूचित जाती प्रवर्गातील सर्व पात्र विद्यार्थ्यांनी शासनाच्या https://mahadbtmahait.gov.in महाडीबीटी या संकेतस्थळावर अर्ज भरण्यात यावे. तसेच आपले महाविद्यालयात प्रवेशित योजनेस पात्र असलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील संपूर्ण विद्यार्थ्यांचे अर्ज महाडीबीटी या संकेतस्थळावर तात्काळ भरून घेण्याची कार्यवाही करण्यात यावी. पात्र अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी घ्यावी, असे आवाहन समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त सुनिल वारे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती