वन्यजीव सप्ताह निमित्य अमरावती मेळघाट व्याघ्र प्रकल्पाव्दारे विविध उपक्रम
अमरावती, दि. 6 : मुख्य वनसंरक्षक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती कार्यालयामार्फत दि. 1 ते 7 ऑक्टोबर 2023 दरम्यान वन्यजीव सप्ताहाचे आयोजन करण्यात येत आहे. वन व वन्यजीव संरक्षण जनजागृती सप्ताहामध्ये विविध स्पर्धेव्दारे जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे वनपरिक्षेत्र अधिकारी पी.एस.भड यांनी दिली.
सोमवार दि. 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी व लाल बहादुरशास्त्री यांच्या जयंती निमित्य मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षण तथा क्षेत्रसंचालक ज्योती बॅनर्जी यांनी प्रतिमेला हार अर्पण अभिवादन केले. यावेळी विभागीय वन अधिकारी मनोजकुमार खैरनार, दस्ताऐवज अधिकारी योगेश तापस, वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप भड, मेळघाट व्याघ्र प्रकल्प अधिकारी मुकेश जावरकर, अशोक सोनोने, संदीप खंडारे, आकाश सारडा, रेखा कोकरे, विक्रम रॉय, उमेश सिरसाबंदे, स्वप्नील बांगळे, आनंद बिबट प्रज्ञा मोहोड आदी उपस्थित होते. त्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि वन्यजीव व पर्यावरण संवर्धन संस्था अमरावती यांचे संयुक्त विद्यामाने कुलाढाप सभागृह येथे ‘इको व्हॉलेंटीअर कार्यशाळा’ चे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी कार्यशाळेत उपस्थित होते.
मंगळवार दि. 3 ऑक्टोबर 2023 रोजी निसर्ग निर्वाचन संकुल येथे रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. बुधवार दि. 4 ऑक्टोबर रोजी शालेय विद्यार्थ्यांकरीता वने व वन्यजीव संदर्भात चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. गुरुवार दि. 5 ऑक्टोबर रोजी शालेय विद्यार्थ्यांकरीता वने व वन्यजीव संदर्भात फॅन्सी ड्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. तर शुक्रवार दि. 6 ऑक्टोबर रोजी शालेय विद्यार्थ्यांसाठी वन वनवा व मानव वन्यजीव संघर्ष या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन कुलाढाप सभागृह, अमरावती येथे करण्यात आले.
000000
No comments:
Post a Comment