महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज तात्काळ भरावे

 महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज तात्काळ भरावे

 

             अमरावती दि. 13(जिमाका) :  सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या महाडीबीटी प्रणालीद्वारे  विद्यार्थ्यांना विविध शिष्यवृत्तीसाठी सन 2023-24 या शैक्षणिक वर्षातील प्रथम वर्षाचे नुतनीकरण अर्ज करण्याची प्रक्रिया महाडीबीटी संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आली आहे. तरी पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाईन महाडीबीटी संकेतस्थळावर अर्ज करावा,असे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

 

सामाजिक न्याय विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्यामार्फत महाडीबीटी प्रणालीवर अनुसूचित जाती, विजाभज, इमाव, विमाप्र प्रवर्गांसाठी  भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती,  शिक्षण फी  परीक्षा फी योजना, राजर्षि छत्रपती शाहू महाराज  गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रम संलग्न्न वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निर्वाहभत्ता व व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतीपूर्ती योजना या योजना राबविण्यात येतात.

 

          माहिती व तंत्रज्ञान विभागमार्फत सन 2023-24 वर्षातील महाडीबीटी पोर्टलवर विविध योजनेचे प्रथम वर्षाचे व नुतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी   https://mahadbtmahait.gov.in   महाडीबीटीच्या या संकेतस्थळावर कार्यन्वित करण्यात आली आहे. तसेच सन 2022-23 चे अर्ज रिअप्लाय करण्याची प्रक्रिया सुरु आहे. महाविद्यालयात प्रवेशित योजनेस पात्र असलेल्या विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन महाडीबीटी संकेतस्थळावर भरुन घेण्याची तात्काळ कार्यवाही करण्याची जबाबदारी महाविद्यालयांची आहे. पात्र मागासवर्गीय विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहू नये यासाठी महाविद्यालयांनी दक्षता घ्यावी. सन 2023-24 या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्षास व नुतनीकरणास प्रवेश घेतलेल्या विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी वरील संकेतस्थळावरुन तात्काळ ऑनलाईन अर्ज भरण्याची कार्यवाही करावी, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती