महापदयात्रेसाठी परतवाडा ते चिखलदरा वाहतूक घटांगमार्गे वळवली

 महापदयात्रेसाठी परतवाडा ते चिखलदरा वाहतूक घटांगमार्गे वळवली


अमरावती, दि. 17 (जिमाका):  नवरंग चिखलदरा देवीदर्शन  महापदयात्रा महोत्सव समितीव्दारे आज दि. 18 ऑक्टोंबर रोजी  सकाळी 4 वाजेपासून महापदयात्राचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत रस्त्यावरील वाहतूक कोंडी व अनुचित प्रकार  टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आला असून दि. 18 ऑक्टोंबरच्या 00.01 वा. ते 23 वाजेदरम्यान धामणगाव गढी मार्ग बंद करुन रस्त्याचे वाहतूक घटांग मार्गे वळविणाचा आदेश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी निर्गमित केला आहे.


महापदयात्रा श्री. नवरंग मंदिर परतवाडा येथुन सुरु होऊन सदर बाजार, धोतखेडा एकलासपूर, धामणगांव गढी, मनभंग, मडकी, मोथा ते श्री. क्षेत्र अंबादेवी मंदिर चिखलदरा येथे समापन होणार आहे. या पदयात्रेत सुमारे 25 हजार भाविक सहभागी होतील. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक घटांग मार्गे वळविणात आली आहे. वाहन चालकांनी या अधिसूचनेचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्याविरुध्द मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. कटियार यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती