नवरात्र व अंबादेवी यात्रा उत्सवात शहरातील वाहतूक मार्गात बदल

 नवरात्र व अंबादेवी यात्रा उत्सवात शहरातील वाहतूक मार्गात बदल

अमरावती, दि. 13 (जिमाका) : अमरावती शहरात श्री अंबादेवी संस्थान येथे दि. 15 ते 24 ऑक्टोबर  या कालावधीत नवरात्र व अंबादेवी यात्रा उत्सव साजरा होत असतो. या कालावधीत मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.

 

बंद करण्यात आलेले मार्ग

 

वाहतूकीसाठी दि. 15 ते 24 ऑक्टोबरपर्यंत पुढील मार्ग बंद करण्यात आले आहे. राजकमल चौक ते अंबागेट, साबणपुरा खिडकी ते गांधी चौक, ओसवाल भवन ते गांधी चौक, डॉ. धवड यांचा दवाखाना ते गांधी चौक, मुख्य पोस्ट ऑफिस रोड ते पंचशील लाँड्री आणि गांधी चौक, भुतेश्वर चौक ते गांधी चौक, नमुना गल्लीकडून अंबादेवी देवस्थानाकडे जाणारे सर्व लहान रस्ते या कालावधीत बंद राहतील. तसेच सक्करसाथ ते भाजीबाजार जैन मंदिरापर्यंत, टांगापडाव ते साबनपुरा पोलीस चौकी ते प्रभात चौक हा रस्ता अरुंद असल्याने जड वाहनास बंद राहील. अंबागेट ते औरंगपुरामार्गे अंबादेवी मंदिराकडे जाणारा मार्ग सर्व वाहनांसाठी बंद राहील.

 

वाहतूकीस पर्यायी मार्ग

 

            मालवाहू जड व हलकी, गिट्टी, बोल्डर, वाहने जुनी वस्ती बडनेरा टी पॉईंट येथून जुना बायपासमार्गे एमआयडीसी, दस्तूरनगर चौक, चपराशीपुरा चौक, बियाणी चौक येथून डावे वळण घेऊन गर्ल्स हायस्कूल चौक, इर्विन चौक, मालवीय चौक, दीपक चौक मार्गाचा अवलंब करता येईल. बस स्टँड, राजकमल, गद्रे चौकमार्गे बडनेराकडे जाणाऱ्या व येणाऱ्या एसटी बसेस वाहनांनी राजापेठ-इर्विन चौक या उड्डाणपुला वरून गर्ल्स हायस्कुल चौक, पोलीस पेट्रोल पंप, एस टी. डेपो किंवा जुनी वस्ती बडनेरा येथून उजवे वळण घेऊन जुना बायपास मार्गाने दस्तुर नगर चपराशीपूरा चौक, बस स्टॅन्ड या पर्यायी मार्गाचा अवलंब करतील. एस. टी. स्टँन्ड येथून नागपुरी गेट मार्गे गावी जाणारे एस. टी. बसेस या रेल्वे स्टेशन चौक, इर्विन चौक ते चित्रा चौक मार्गे जातील. व याच मार्गाने शहरात येऊन गर्ल्स हायस्कुल चौक मार्गे एस. टी. स्टँन्ड येथे जातील.  राजापेठ चौकाकडून शहरात येणारी हलकी चारचाकी वाहनधारकांनी राजापेठ उड्डाण पुलाचा वापर करावा.

 

 

वाहनतळ पार्कींग व्यवस्था

 

            गांधी चौक येथील पार्कींग स्थळ नवरात्र कालावधीत बंद राहील. तसेच दोन्ही मंदिरालगत दोनशे मीटर अंतरापर्यंत कोठेही वाहन ठेवता येणार नाही. वाहनतळ पार्कींगची व्यवस्था नेहरु मैदान, ओसवाल भवन मैदान, मुधोळकर पेठ मैदान, ओसवाल भवन ते गद्रे चौकाकडील रस्त्याच्या एका बाजूस तसेच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या वळणापासून साई नगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूस आणि साबनपुरा चौक ते जवाहरगेटकडील रस्त्याच्या एका बाजूस करण्यात आली आहे.

 

            वाहन चालकांनी या अधिसूचनेचे पालन करणे आवश्यक आहे. अन्यथा त्यांच्याविरुध्द मोटार वाहन कायद्यांतर्गत करवाई करण्यात येईल. हा आदेश दि. 24 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील, असे आवाहन पोलीस उपायुक्त सागर पाटील  यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती