Tuesday, October 17, 2023

नांदगाव खंडेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे 21 ऑक्टोंबर रोजी रोजगार मेळावा

 नांदगाव खंडेश्वर औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे 21 ऑक्टोंबर रोजी रोजगार मेळावा


             अमरावती, दि. 17 (जिमाका): शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रोजगार मेळाव्यात नामांकित कंपनी सहभागी होणार असून इच्छुक पात्र युवक युवतीनी शनिवार दि. 21 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य एन.ए. भुकवाल यांनी केले आहे.


रोजगार मेळाव्याचे उद्घाटन खासदार डॉ.अनिल बोंडे व खा. रामदासजी तडस यांच्या हस्ते होणार आहे. मुख्य अतिथी म्हणून आमदार ॲड. किरण सरनाईक, आ.धिरज लिंगाडे, आ.प्रतापदादा अडसड, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुंबई संचालक दिगंबर दळवी, सहसंचालक प्रदिप घुले, संस्थेचे अध्यक्ष समित सिंघई, चांदुर रेल्वे संस्थेचे अध्यक्ष हेमंत जाधव, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे उपायुक्त दत्तात्रय ठाकरे आदी उपस्थित राहणार आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...