जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम

 जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम

        अमरावती, दि.10: जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त (12 जून) सर्व दुकाने, आस्थापना, कारखाने, हॉटेल्स, ढाबा, गॅरेजेस, वीटभट्टी व इतर आस्थापना मालक संघटना, हॉटेल असोसिएशन, खाद्य पेय विक्री असोसिएशन, किराणा असोसिएशन यांची बैठक आयोजित करण्यात आली. यामध्ये ‘बालकामगार’ या अनिष्ट प्रथेतून अमरावती जिल्हा मुक्त करण्यासाठी जनजागृती करण्यात आली.

            बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम 1986 तसेच सुधारणा 2016 अन्वये 14 वर्षाखालील बालकांना कामावर ठेवल्यास अधिनियमातील तरतुदीनुसार आस्थापना मालकास प्रतिबंध करण्यात आला असून 6 महिने ते 2 वर्षापर्यंत शिक्षेची तरतुद आहे. तसेच सुमारे 20 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतुदही आहे. यानुसार 18 वर्षाखालील किशोरवयीन कामगारांना सर्व धोकादायक उद्योग व प्रक्रियेमध्ये काम करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

            बाल कामगारांना कामावर ठेवण्यात येऊ नये. तसेच बालकामगार आढळून आल्यास कामगार विभागाच्या 0721-2662115 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कामगार उपाआयुक्त सतिश पाटणकर यांनी केले आहे.

000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती