तृतियपंथिय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन

 

 तृतियपंथिय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन

 

अमरावती, दि.7: तृतियपंथियांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्कासाठी राज्य स्तरावर व विभागीय स्तरावर तृतियपंथिय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करण्यास मान्यता आहे. त्याच धर्तीवर शासन निर्णय दिनांक 8 जुन 2020 अन्वये महाराष्ट्र राज्य तृतियपंथिय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करण्यात आले आहे.

तृतियपंथिय आणि ट्रांन्सजेंडर हा समाजातील एक दुर्लक्षित घटक असून या घटकास समाजाकडून सापत्न व भेदभावाची वागणुक दिली जाते व नेहमीच भेदभाव व सापत्न वागणुकीमुळे समाजातील हा घटक विकास प्रक्रीये पासून दुर्लक्षित राहीलेला आहे. त्यामुळे या घटकाचे शासनामार्फत मुलभूत अधिकारांचे संरक्षण करून त्यांना विकासाची समान संधी उपलब्ध्‍ करून देणे आवश्यक आहे.

याकरिता जिल्ह्यातील सर्व तृतियपंथियांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा व त्यांच्या तक्रारी निवारण करता यावे. या करिता महाराष्ट्र शासनाच्या पोर्टल वर नोंदणी करणे आवश्यक आहे. परंतु अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने समाज कल्याण आयुक्तालय पुणे यांनी वेळापत्रकानुसार शिबिराचे आयोजन करण्याकरिता निर्देशित केले आहे. या करिता जिल्ह्यातील सर्व तृतिय पंथियांनी दिनांक 7 जुन 2022 पर्यंत कार्यालय सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अमरावती येथे नोंदणी करण्याकरिता उपस्थित राहावे. याबाबतची माहिती http://transgender.dosje.gov.in या पोर्टल वर देण्यात आली आहे.

तरी जिल्ह्यातील सर्व तृतिय पंथियांनी दिनांक 7 जुन  रोजी सकाळी 11 वाजता या नोंदणी अभियानास उस्फुर्त सहभाग नोंदवावा व आपल्या विकासाची दिशा निश्चित करावी. आपल्या समस्याचे निवारण करावे. असे आवाहन सहाय्य्क आयुक्त समाज कल्याण माया केदार यांनी केले आहे.

0000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती