आस्थापनांनी ई-आर 1 विवरण भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा वापराव्यात

 

आस्थापनांनी ई-आर 1 विवरण भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा वापराव्यात

अमरावती, दि.20: आस्थापनांनी ई-आर 1 विवरण भरण्यासाठी ऑनलाइन सुविधा वापराव्यात, असे आवाहन जिल्हा रोजगार, कौशल्य विकास व उद्योजकता केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

 कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय यांच्याकडून पुरविण्यात येणाऱ्या रोजगार विषयक सर्व सेवा आता ऑनलाइन करण्यात आलेल्या आहेत. त्यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ विकसित करण्यात आले आहे. आस्थापनांना त्रैमासिक ई-आर 1 ऑनलाइन सादर करणे बंधनकारक आहे. त्यानुसार जू 2022 अखेर संपणाऱ्या तिमाहीसाठी ई-आर 1 या प्रपत्राची माहिती या संकेतस्थळावर लॉगिन करून ऑनलाइन सादर करावी. काही अडचण आल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी साधावा अथवा दूरध्वनी क्रमांक 0721-2566066 यावर संपर्क साधावा. ई-आर 1 सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2022 आहे. ई- आर 1 ऑनलान सादर न करणाऱ्या आस्थापनेवर कारवाई करण्याचा इशारा सहायक आयुक्त प्रफुल्ल शेळके यांनी दिला आहे.

0000

--

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती