Thursday, June 16, 2022

सौर पंप योजनेच्या अर्जदारांनी बनावट संकेतस्थळापासून सावध राहावे ‘महाऊर्जा’चे आवाहन

 

सौर पंप योजनेच्या अर्जदारांनी बनावट संकेतस्थळापासून सावध राहावे

महाऊर्जाचे आवाहन

 

अमरावती, दि. 15 : सौर पंप मिळवून देण्याच्या नावाखाली बनावट संकेतस्थळे, ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन भरणा करायला सांगून शेतकरी बांधवांची फसवणूक होत आहे. अशा खोट्या व फसव्या संकेतस्थळे, मोबाईल ॲपपासून सावध राहण्याचे आवाहन ‘महाऊर्जाचे विभागीय व्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी केले आहे.

 

प्रधानमंत्री कुसुम योजना राज्य शासनाच्या ‘महाऊर्जा अभिकरणामार्फत राबविण्यात येत आहे. काही बनावट संकेतस्थळावर सौर पंपासाठी अर्ज व फी भरण्याचे सांगितले जाऊन अर्जदारांची फसवणूक होत आहे. अशा फसव्या आवाहनाला बळी पडू नये व संकेतस्थळावर किंवा ॲपवर पैश्याचा भरणा करू नये, असे आवाहन त्यांनी केले.

 

योजनेच्या सविस्तर माहितीसाठी व ऑनलाईन नोंदणीसाठी www.mahaurja.com वर संपर्क साधावा किंवा ‘महाऊर्जाच्या विभागीय क्रीडा संकुलातील कार्यालयात, तसेच (0721)2661610 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन त्यांनी केले.

00000

 

 

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...