कृषी निविष्ठांबाबतच्या तक्रारींच्या निवारणासाठी विभाग व जिल्हा स्तरावर कक्ष गैरप्रकार करणारांवर कठोर कारवाई करा - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 


कृषी निविष्ठांबाबतच्या तक्रारींच्या निवारणासाठी विभाग व जिल्हा स्तरावर कक्ष

 गैरप्रकार करणारांवर कठोर कारवाई करा

-  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

         अमरावती, दि. 15 : कृषी निविष्ठांबाबतच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करून शेतकरी बांधवांना न्याय मिळवून द्यावा. बोगस बियाणे, तसेच बियाणे, खते यांची चढ्या दराने विक्री, साठेबाजी असे गैरप्रकार आढळून आल्यास कठोर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.

 

            पावसाला सुरुवात झाली आहे. या काळात कृषी निविष्ठांची सर्वत्र उपलब्धता असणे आवश्यक आहे. तथापि, जिल्ह्यात काही ठिकाणी निविष्ठांबाबत तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा तक्रारींचे तत्काळ निवारण करावे. प्रत्यक्ष तपासण्यांचे प्रमाण वाढवावे. शेतकरी बांधवांची कुठेही अडवणूक होता कामा नये. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी भरारी पथकांच्या माध्यमातून कठोर नियंत्रण निर्माण करावे. त्याचप्रमाणे, स्वत: अधिका-यांनीही वेळोवेळी ठिकठिकाणी भेटी देऊन तपासण्या कराव्यात. कुठेही गैरप्रकार घडू नयेत, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

 

            दरम्यान,  खरीप व रब्बी हंगामात शेतकरी बांधवांना  वेळेवर आणि योग्य दराने कृषी निविष्ठा मिळण्याबाबत व कृषी निविष्ठांच्या तक्रारींबाबतचे संनियंत्रण करण्यासाठी विभाग स्तरावर खरीप हंगामासाठी 15 ऑगस्टपर्यंत व रब्बी हंगामासाठी 15 सप्टेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या तक्रार निवारण कक्षाचे कामकाज सकाळी 10 ते रात्री 7 या कालावधीत सुरु राहील. कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी कक्षात उपस्थित राहतील, अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक के. एस. मुळे यांनी दिली.

 

              विभाग स्तरावरील तक्रार निवारण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक (0721)2552422 व 7498264549 आणि टोल फ्री क्रमांक 1800-233-4000 असा आहे. तंत्र अधिकारी(गुणनियंत्रण)आर. एस. जानकर यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9130301212 असा आहे. विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरिक्षक ए. एस. मस्करे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 7588080633, कृषि अधिकारी (निवीष्ठा) ए. डी. तांबे यांचा 7350896629, वरिष्ठ लिपीक एस. टी. नागे यांचा 9822012341 आणि वरिष्ठ लिपीक यु. एस. बसले यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9890462179 असा आहे. 

 

 कृषी निविष्ठांबाबत काही तक्रार असल्यास जिल्हा स्तरावरही तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याचा क्रमांक 9325962775 असा आहे. संपर्क अधिकारी जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे. कृषी निविष्ठांची जादा दराने विक्री, गुणवत्ता, मुदतबाह्य विक्री, साठेबाजी, अनधिकृत निविष्ठांची विक्री याबाबतची तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान यांनी केले.

 

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती