शहर वाहतुकीत दि. 14 एप्रिल रोजी तात्पुरता बदल; पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलीस विभागाचे आवाहन

 

शहर वाहतुकीत दि. 14 एप्रिल रोजी तात्पुरता बदल;

पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलीस विभागाचे आवाहन

       अमरावती, दि.12(जिमाका) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती रविवार दि. 14 एप्रिल रोजी मोठया उत्साहत साजरी केली जाते. यादिवशी मिरवणूका, उत्सव आदी बाबी लक्षात घेता शहर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे, अशी माहिती अमरावती शहर वाहतूक विभागाचे पोलीस आयुक्त कल्पना बारवकर यांनी कळवली आहे.

           तात्पुरत्या अधिसूचनेनुसार यादिवशी इर्विन चौकाकडे येणारी सर्व प्रकारची वाहतूक इतर मार्गाने वळविण्यात आली आहे. ही अधिसूचना दि. 14 एप्रिल रोजी सकाळी 5 ते रात्री 12 वाजतापर्यंत लागू राहील. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करून पोलीसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

         प्रवेश बंद मार्ग : इर्विन चौक ते खापर्डे बगिचा हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांकरिता बंद राहील. गर्ल्स हायस्कुल चौक ते इर्विन चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनाकरिता बंद राहील. बाबा कॉर्नर ते इर्विन चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांकरिता बंद राहील. मर्च्युरी टी पॉईंट ते इर्विन चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनाकरीता बंद राहिल. इर्विन चौक ते मालविय चौक हा मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांकरिता बंद राहील. तसेच मर्च्युरी टी पॉईंट ते इर्विन चौक ते ट्रॅफिक ऑफिस व इर्विन चौक ते होलिक्रॉस शाळेचे प्रवेशद्वारापर्यंत कोणतेही वाहन पार्क करता येणार नाही.

           पर्यायी मार्ग याप्रमाणे : इर्विन चौक ते खापर्डे बगिचा या मार्गाने वाहतूक करणाऱ्या वाहनांनी एस. टी. बसस्थानक मार्गाचा अवलंब करावा.  गर्ल्स हायस्कूल चौक ते इर्विन चौक या मार्गाने वाहतूक करणारी वाहने पोलीस पेट्रोल पंप चौक किंवा बाबा कॉर्नर ते विलास नगर रोड या मार्गाचा अवलंब करतील. बाबा कॉर्नर ते इर्विन चौक या मार्गाने वाहतुक करणाऱ्या वाहनांनी लेखूमल चौक किंवा पोलीस पेट्रोल पंप या मार्गाचा अवलंब करावा. रेल्वे स्टेशन चौक ते मर्च्युरी टी पॉईंट या मार्गाने वाहतूक करणारी वाहने रेल्वेस्थानक ते एस. टी. स्थानक व जयस्तंभ चौक, दीपक चौक, चौधरी चौक या मार्गांचा अवलंब करतील. मालविय चौक ते इर्विन चौकाकडे येणाऱ्या वाहनानी मालविय चौक, जयस्त्ंभ चौक, रेल्वे स्टेशन चौक या मार्गाचा अवलंब करतील.

            वरील वाहतूक नियम  रूग्णवाहिका, अग्निशामक वाहन, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना लागू राहणार नाही. तसेच या अधिसूचनाचे जो कोणी वाहन चालक उल्लंघन करेल त्यांचेविरुद्ध मोटार वाहन कायदा प्रमाणे कायेदशीर कारवाई करण्यात येईल, असे प्रसिद्धी पत्राव्दारे कळविण्यात आले आहे.

0000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती