36-धामणगाव रेल्वे मतदार संघातील निवडणूक कर्तव्यावर असलेले शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी पोस्टल मतपत्रिकेद्वारे मतदान करावे

 

36-धामणगाव रेल्वे मतदार संघातील निवडणूक कर्तव्यावर असलेले शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी पोस्टल मतपत्रिकेद्वारे मतदान करावे

अमरावती, दि. 20 (जिमाका): सार्वत्रिक लोकसभा निवडणुक-2024 करिता 36-धामनगाव रेल्वे मतदारसंघातील सर्व मतदान केंद्रावर पहिल्या प्रशिक्षणाच्या वेळी नियुक्ती आदेश प्राप्त झालेले तसेच मतदान कर्तव्यावर असलेले शासकीय कर्मचारी यांचे अर्ज क्रमांक 12 प्राप्त झालेले आहेत. अर्ज क्र. 12 नुसार त्यांच्या प्रशिक्षणाच्या वेळेस दिलेल्या अर्जानुसार त्यांचे पोस्टल मतपत्रिका दुसऱ्या प्रशिक्षणाच्या वेळेस ज्या विधानसभा मतदारसंघात नियुक्तीचे आदेश प्राप्त झाले आहे,  त्या ठिकाणी पोस्टल मतपत्रिका मतदान सुविधा केंद्रावर (Facility Center)  पाठविण्यात आल्या आहेत. तरी मतदान कर्तव्यावर नियुक्त असलेले सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी पोस्टल मतपत्रिका प्राप्त झाल्याबाबत शहानिशा करुन मतदान करावे व लोकसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 चे मतदान प्रक्रीयेत नियमानुसार कर्तव्य बजावणी करुन मतदान प्रक्रीयेत सहकार्य करावे असे आवाहन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा चांदूर रेल्वे उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती