Wednesday, April 3, 2024

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024: 23 उमेदवारांची 27 नामनिर्देशन पत्रे दाखल; 16 व्यक्तींनी केली 27 नामनिर्देशन अर्जांची उचल

 
























सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024:

23 उमेदवारांची 27 नामनिर्देशन पत्रे दाखल; 16 व्यक्तींनी केली 27 नामनिर्देशन अर्जांची उचल

 

अमरावती, दि. 3 (जिमाका): सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत 07-अमरावती (अ.जा.) लोकसभा मतदारसंघात आज बुधवार, दि. 3 एप्रिल रोजी 23 उमेदवारांनी  27 नामनिर्देशन पत्रे दाखल केली. दरम्यान 16 व्यक्तींनी 27 नामनिर्देशन अर्जांची उचल केली. 

 अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी 4 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर 5 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 8 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. शुक्रवार दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर मंगळवार दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. आदर्श आचारसंहिता गुरुवार दि. 6 जून पर्यंत लागू राहणार आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...