Friday, April 19, 2024

मतदार जनजागृतीसाठी तापडीया मॉलमध्ये सेल्फी पाईंटचे जिल्हाधिकारी - सौरभ कटियार यांच्या हस्ते उद्घाटन






 



मतदार जनजागृतीसाठी तापडीया मॉलमध्ये सेल्फी पाईंटचे

जिल्हाधिकारी - सौरभ कटियार यांच्या हस्ते उद्घाटन

 

          अमरावती, दि. 19 (जिमाका) : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीप उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शहरातील तापडीया सिटी सेंटर मॉलमध्ये  सेल्फी पॅाईंट तयार करण्यात आला आहे. या सेल्फी पॅाईंटचा आज जिलहाधिकारी सौरभ कटियार व पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.

 

            अमरावती लोकसभा निवडणुक येत्या शुक्रवारी दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मतदानाच्या दिवशी जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करुन लोकशाही बळकटी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.  यावेळी सहायक जिल्हाधिकारी अकुनूरी नरेश, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, मनपा आयुक्त देवीदास पवार, स्वीपचे नोडल अधिकारी डॉ. कैलास घोडके, तापडीया सिटी सेंटर मॉलचे संचालक मधुकर लढ्ढा, अनुपमा लढ्ढा, डागा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश डागा आदी उपस्थित होते.

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...