मतदारांनी आपला मतदानाचा हक्क चोख बजावावा - जिल्हाधिकारी सौरभ कटियार विभागीय क्रीडा संकुलातील 11 हजार 580 विद्यार्थ्यांच्या ‘आय विल वोट’ या घोषणेने मैदान दुमदुमले

 















मतदारांनी आपला मतदानाचा हक्क चोख बजावावा

                                                              - जिल्हाधिकारी सौरभ कटियार

विभागीय क्रीडा संकुलातील 11 हजार 580 विद्यार्थ्यांच्या आय विल वोट’ या घोषणेने मैदान दुमदुमले

      अमरावती , दि. 08 (जिमाका) - लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढावी यादृष्टीने विविध उपक्रम स्वीप उपक्रमांतर्गत राबविले जात आहेत.  याचाच एक भाग म्हणून आज  सकाळी विभागीय क्रीडा संकुल, येथील मैदानावर 11 हजार 580 विद्यार्थी, महिला, नागरिक,  युवा मतदारांनी मानवी साखळी तयार करुन मतदान प्रक्रियेत मतदारांनी जास्तीत-जास्त सहभाग नोंदवून आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, हा संदेश दिला. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी मतदानाच्या दिवशी अमरावतीकरांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा व या लोकशाहीचा उत्सव सर्वांनी साजरा करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी उपस्थित सर्वांनी मतदानासाठी बाहेर पडावे व मतदान करावे अशी शपथ घेतली. आय विल वोट’ या घोषणेने संपूर्ण मैदान दुमदुमले.  यानंतर मतदान जनजागृतीसाठी प्रशासकीय अधिकारी, विविध संघटनेचे पदाधिकारी,  प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी यांच्यामध्ये क्रिकेट सामना संपन्न झाला. तसेच विविध शाळेच्या विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीसाठी पथनाट्य सादर केले. पद्मश्री शंकरबाबा पापळकर, अमरावती लोकसभा मतदार संघांचे मुख्य निवडणूक निरीक्षक सी. जी. रजनीकांथन, खर्च निवडणूक निरीक्षक अनुप कुमार वर्मा, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर जिल्हाधिकारी सुरज वाघमारे, अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. मिलींद बारहाते, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, महानगरपालिका आयुक्त देविदास पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शिवाजी शिंदे, पोलीस उपायुक्त सागर पाटील तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन स्वीपचे सहायक नोडल अधिकारी डॉ. कैलास घोडके यांनी केले. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी मान्यवरांनी यावेळी खुल्या जीपमधून विद्यार्थ्यांचे निरीक्षण केले.   

नव्वद टक्क्याच्यावर मतदान झाले पाहिजे- पद्मश्री शंकरबाबा पापळकर

अमरावती जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारीत वाढ झाली पाहिजे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सौरभ कटियार यांनी मतदान जनजागृतीसाठी मानवी साखळी हा कार्यक्रम आयोजित केला. जिल्ह्यात जवळपास पन्नास हजाराच्यांवर असलेल्या दिव्यांग, निराधार मतदारांचे मतदान हे अतिशय महत्वाचे असून पंच्च्यांशी वर्षे वयोमर्यादा असलेल्या मतदारांचे मतदान हे घरपोच घेतले जाणार आहे. येणाऱ्या 26 एप्रिल रोजी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन पद्मश्री शंकरबाबा पापळकर यांनी यावेळी केले.

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती