Thursday, April 4, 2024

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024: शेवटच्या दिवशी 29 उमेदवारांची 34 नामनिर्देशन पत्रे दाखल;आतापर्यंत एकूण 59 उमेदवारांची 73 नामनिर्देशन पत्रे दाखल

 

सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024:

शेवटच्या दिवशी 29 उमेदवारांची 34 नामनिर्देशन पत्रे दाखल;आतापर्यंत एकूण 59 उमेदवारांची 73 नामनिर्देशन पत्रे दाखल

 

अमरावती, दि. 4 (जिमाका): सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-2024 अंतर्गत 07-अमरावती (अ.जा.) लोकसभा मतदारसंघात शेवटच्या दिवशी गुरुवार, दि. 4 एप्रिल रोजी 29 उमेदवारांनी  34 नामनिर्देशन पत्रे दाखल केली. तर आतापर्यंत एकूण 59 उमेदवारांनी  73 नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत.

 

            अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. तर  शुक्रवार दि.5 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. 8 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. शुक्रवार दि. 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर मंगळवार दि. 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे. आदर्श आचारसंहिता गुरुवार दि. 6 जून पर्यंत लागू राहणार आहे.

00000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...