अमरावती लोकसभा मतदारसंघात 1 हजार 104 मतदारांनी बजावला गृहमतदानाचा हक्क; दिव्यांग व वयोवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 






अमरावती लोकसभा मतदारसंघात 1 हजार 104 मतदारांनी बजावला गृहमतदानाचा हक्क;

दिव्यांग व वयोवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

अमरावती, दि. 15 (जिमाका): सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मतदाराचे मत महत्त्वपूर्ण आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यावर्षी प्रथमच 85 वर्षांवरील मतदार आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहेत. या सुविधेचा अमरावती लोकसभा मतदार संघातील 1 हजार 104 मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावला. दिव्यांग व वयोवृद्ध व्यक्तींनी बॅलेट पेपरव्दारे गोपनीयता बाळगत उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावला.

        दुसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये अमरावती मतदारसंघासाठी येत्या 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यावर्षी आयोगाने 85 वर्षाहून अधिक वय असणारे मतदार व दिव्यांग मतदार ज्यांनी 12 डी नमुना भरून दिला अशा मतदारांना गृहमतदान करण्यात आले. अमरावती लोकसभा मतदार संघातील एकूण 1 हजार 167 नागरिकांनी गृहमतदानाची इच्छा दर्शविली होती. त्यापैकी 1 हजार 104 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये 85 वर्षांवरील मतदारांची संख्या 922 आणि दिव्यांग मतदारांची संख्या 182 आहे. अमरावती लोकसभा मतदार संघातील विधानसभा मतदार संघनिहाय सविस्तर माहिती याप्रमाणे.

            37-बडनेरा मतदारसंघामध्ये 85 वर्षांवरील 102 तर दिव्यांग 21, 38-अमरावती मतदारसंघामध्ये 85 वर्षांवरील 197 तर दिव्यांग 56, 39- तिवसा मतदारसंघामध्ये 85 वर्षांवरील 252 तर दिव्यांग 29, 40-दर्यापूर मतदारसंघामध्ये 85 वर्षांवरील 74 तर दिव्यांग 38, 41- मेळघाट मतदारसंघामध्ये 85 वर्षांवरील 145 तर दिव्यांग 11 व 42-अचलपूर मतदारसंघामध्ये 85 वर्षांवरील 152 तर दिव्यांग 27 असे एकूण 85 वर्षांवरील 922 तर दिव्यांग 182 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गृहमतदानाची प्रक्रिया दि. 12 ते 14 एप्रिल दरम्यान राबविण्यात आली. मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी विधासभानिहाय मतदान अधिकारी, सहायक मतदान अधिकारी तसेच सूक्ष्म निरीक्षक, पोलीस व व्हिडीओग्राफर यांचामार्फत पारदर्शक व गोपनीय पद्धतीने पूर्ण करण्‍यात आली.

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती