ग्रीष्मकालीन क्रीडा प्रशिक्षण शिबिराला 21 एप्रिलपासून सुरुवात

 

ग्रीष्मकालीन क्रीडा प्रशिक्षण शिबिराला 21 एप्रिलपासून सुरुवात

          अमरावती, दि. 18 (जिमाका):  क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद अमरावती तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अमरावती यांच्यामार्फत ग्रीष्मकालीन क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्रांतर्गत विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे व इतर ठिकाणी दि. 21 ते 30 एप्रिल तसेच 1 ते 10 मे 2024 या कालावधीत शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या शिबिरामध्ये विद्यार्थी, खेळाडू यांना तज्ज्ञ मार्गदर्शकामार्फत मार्गदर्शन करण्यात येईल. शिबिरादरम्यान खेळ, क्रीडा यासह व्यक्तिमत्त्व विकास, आहार, दुखापतीवरील इलाज, फिजिओथेरपी, क्रीडा मानसशास्त्र आदी बाबींवर मार्गदर्शन करण्यात येईल. विभागीय क्रीडा संकुल येथे सकाळी 6 ते 7.30 तसेच सायंकाळी 5.30 ते 7 या वेळेत विविध खेळांचे प्रशिक्षण देण्यात येईल.

              धर्नुविद्या खेळासाठी नितू इंगोले, प्रफुल्ल डांगे, बास्केटबॉल खेळाकरिता विजया खोत, हॉकी करिता सुशील सुर्वे, नेटबॉलसाठी नितीन जाधव, मल्लखांबासाठी नरेंद्र गाडे, कुडो क्रीडा प्रकाराकरिता असलम शहा, टेबल टेनिससाठी हमीद खान, शहबाज खान, स्केटिंगसाठी शाम भोकरे, प्रसाद जोशी, मैदानी खेळाकरिता अतुल पाटील, तांग ता मार्शल आर्टसाठी महावीर धुळधर, बुध्दीबळ खेळाकरिता पवन डोडेजा, स्क्वॅश क्रीडा प्रकाराकरिता गणेश तांबे, सुविध्य वानखडे, बॉक्सिंगसाठी समीर कोरपे, सॉफ्टबॉलसाठी अभिजीत इंगोले, फुटबॉलसाठी सुशील सुर्वे, दिनेश म्हाला यांच्याशी संपर्क साधावा.

            जिल्ह्यात इतर ठिकाणी मंडळ तसेच संघटनांमार्फत क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये कला व वाणिज्य महाविद्यालय येथे फुटबॉलसाठी दिनेश म्हाला, सिध्दार्थ क्रीडा मंडळ, फ्रेजरपुरा येथे सुदाम बोरकर, राजेश्वरी स्कूल बडनेरा येथे कराटेसाठी सोनल रंगारी, पाचबंगला बडनेरा येथे आश टडू आखाडासाठी संघरक्षक बडगे तसेच श्री हनुमान प्रसारक मंडळ, अमरावती येथे विविध खेळाचे प्रशिक्षण आयोजित करण्यात येत आहे. श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय येथे योगासनासाठी प्रा. विश्वास जाधव, मालु इंटरनॅशनल स्कूल येथे धर्नुविद्या खेळासाठी विजय फसाटे, संत गजानन क्रिकेट अकॅडमी, पी.डी.एम.सी. येथे विजय गावंडे, धारणी तालुका क्रीडा संकुल येथे कराटेसाठी रुपेश तायडे, एनटीआर हायस्कुल, वरुड, प्रबोधन विद्यालय दर्यापूर, प्रेम किशोर सिकची विद्यालय, अमरावती, एकलव्य धर्नुविद्या अकॅडमी नांदगाव खंडेश्वर, चांदुर बाजार क्रीडा संकुल येथे कबड्डी असे विविध खेळांचे आयोजन करण्यात येत आहे.

            इच्छुक खेळाडू, विद्यार्थ्यांनी सबंधित प्रशिक्षण केंद्र किंवा मार्गदर्शक अथवा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती