Wednesday, April 10, 2024

अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

 


अनोळखी मृत इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन

             अमरावती, दि. 10 (जिमाका): पोलिस ठाणे सिटी कोतवाली अमरावती (शहर) अंतर्गत एका अनोळखी इसमाची इर्विन दवाखान्यात  उपचारा दरम्यान मृत्यू झाला. मृतकाचा बांधा सडपातळ, रंग सावळा, उंची 5 फुट 6 इंच, चेहरा लांबट, उजव्या हातावर अमोल कांदेल असे नाव गोंदलेले असून, अंगात पांढऱ्या रंगाचे फुल बाह्याचे शर्ट, व काळ्या रंगाचे स्पोर्टचे लोअर घातलेले होते.

मृतकाच्या नातेवाईकाचा शोध लागावा व अनोळखी इसमाची ओळख पटविण्यास पोलीस नियंत्रण कक्ष, अमरावती शहर दुरध्वनी क्रमांक - 0721-2672001 किंवा वपोनी मनोहर कोटानाके भ्रमणध्वनी क्रं. 8390151921 व मनोज सुने भ्रमणध्वनी  क्रं. 8788231142 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, अमरावती यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...