Monday, April 8, 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024; उमेदवारांचे खर्च नोंदणी तपासणीचे वेळापत्रक जाहिर

 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024;

उमेदवारांचे खर्च नोंदणी तपासणीचे वेळापत्रक जाहिर

 

             अमरावती दि. 08 (जिमाका)  :  अमरावती लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवारांचे खर्च नोंदवहीच्या तपासणीसाठी वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे. वेळापत्रकानुसार सर्व उमेदवारांनी आपले खर्चाचे लेख आवश्यक त्या सर्व अभिलेख्यासह तपासणीसाठी स्वत: किंवा प्राधिकृत प्रतिनिधीमार्फत उपलब्ध करुन द्यावे. सदर तपासणी निवडणुक आयोगाच्या निर्देशानुसार अनिवार्य असल्याने सर्व उमेदवार किंवा प्राधिकृत प्रतिनिधीने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

  वेळापत्रक याप्रमाणे : पहिली तपासणी  दि. 12 एप्रिल 2024, दुसरी तपासणी दि. 19 एप्रिल रोजी तर तिसरी तपासणी दि.24 एप्रिल रोजी होईल. तपासणीचा वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत नियोजन भवन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अमरावती येथे होईल. वरील दिनांकाला सर्व उमेदवारांच्या लेख्यांची तपासीण वेळेअभावी पुर्ण होऊ शकली नाही तर उर्वरित उमेदवारांच्या लेख्याची तपासणी त्याच ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत पुर्ण करण्यात येईल.

00000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...