प्रत्येक कर्जदारास वैयक्तिकरित्या दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ - सुभाष देशमुख


नागपूरदि. 20 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत प्रती कुटुंब दीड लाखाच्या मर्यादेत कर्जमाफीची अट होतीमात्र आता प्रत्येक कर्जदारास वैयक्तिकरित्या दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी विधानपरिषदेत निवेदनाव्दारे दिली.
श्री. देशमुख म्हणालेकुटुंबाची थकबाकीची एकुण रक्कम दीड लाखापेक्षा जास्त असल्यास त्यांना दीड लाखावरील रक्कम आगाऊ भरल्यानंतर शासनातर्फे दीड लाख कर्जमाफीचा लाभ देण्याचा निकष होता. आता शासनाने अशा प्रकरणी कुटुंबाची अट शिथील केली असून प्रत्येक कर्जदारास दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल. यामुळे कर्जमाफीच्या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबातील पती/पत्नी व मुले यांना प्रत्येकी दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. या अनुषंगाने एकरकमी परतफेड योजनेत पात्र झालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीची भरावी लागणारी रक्कम कमी होणार आहे. यामुळे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना होणार आहे.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती