मराठा आरक्षण निर्णय झाल्यावर नोकरीमध्ये 16 टक्के जागा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


नागपूरदि. 19 : महानोकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात जागा भरायच्या आहेत. मराठा आरक्षण निर्णय झाल्यावर 16 टक्के जागा बॅकलॉग म्हणून भरल्या जातील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत सांगितले.
            विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी अल्पकालीन चर्चेदरम्यान मराठा आरक्षणाचा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणालेमराठा आरक्षणप्रश्नी उच्च न्यायालयाने सरकारला वैधानिक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. मागासवर्गीय आयोग राज्यातील विविध ठिकाणी जाऊन जन सुनावणी करीत आहेत. त्यांचा अहवाल अद्याप अप्राप्त आहे. आरक्षणासंदर्भात मागासवर्गीय आयोगाला सहकार्य करण्याची भूमिका शासनाची आहे. महाभरतीमध्ये शासनामार्फत विविध खात्यांच्या जवळपास 36 हजार 872 जागा भरण्यात येणार आहेत. या नोकऱ्यांमध्ये मराठा समाजावर अन्याय होऊ नये म्हणून 16 टक्के जागा राखीव समजण्यात येतील. उच्च न्यायालयाचा आरक्षणाबद्दलचा निर्णय झाल्यावर बॅकलॉग म्हणून या 16 टक्के जागा भरल्या जातीलअसे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती