Tuesday, July 10, 2018

सातबारा विना विलंब मिळण्यासाठी
स्टेट डेटा सेंटरमध्ये तात्पुरती जागा वाढविणार
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर, दि. 9 : डिजिटल सातबारा तातडीने उपलब्ध व्हावा यासाठी स्टेट डेटा सेंटरमध्ये तात्पुरती स्पेस वाढवून घेण्यात येईल. सातबारा देताना सर्व्हर डाऊन होणार नाही. याची खबरदारी घेऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान सभेत सांगितले.
सदस्य हर्षवर्धन जाधव यांनी यासंदर्भात मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना मुख्यमंत्री म्हणाले, स्टेट डेटा सेंटर मध्ये जागेची मर्यादा आहे. त्यामुळे आता राज्य शासन स्टेट डेटा सेंटरमधील डेटा क्लाऊड कॉम्प्युटिंगवर स्थलांतरित करीत आहेत. यामुळे अमर्याद जागा उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सर्व्हर डाऊन होणार नाही. मात्र, डेटा स्थलांतरित करतानाच सध्या तात्पुरत्या स्वरुपात स्टेट डेटा सेंटरमध्ये जागा वाढवून घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
००००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...