अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांच्याकडून ग्राम परिवर्तन अभियानातील गावांची पाहणी   
सौर ऊर्जा प्रकल्प व घनकचरा व्यवस्थापनाला चालना द्यावी

                        -अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी
अमरावती, दि. 17 ः मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाद्वारे सुरु असलेले नानाविध उपक्रम ग्रामविकासाला चालना देणारे आहेत. गावाच्या सर्वांगीण विकासासाठीसौर ऊर्जा प्रकल्प व घन कचरा व्यवस्थापनाला चालना द्यावी, असे मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी यांनी नुकतेच शेंदोळा खुर्द येथे सांगितले.   
मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात समाविष्ट गावांत सुरु असलेल्या विकासकामांची पाहणी श्री. परदेशी यांनी नुकतीच  केली. त्यात तिवसा तालुक्यातील आदर्श ग्राम शेंदोळा खुर्द येथील आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी अभिजीत बांगरजि. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री  उपस्थित होते.     
आरओ वॉटर प्लान्टमुळे शेंदोळा खुर्द येथे स्मार्ट कार्डद्वारे 5 रुपयांत 20 लिटर थंड शुद्ध पाणी उपलब्ध झाले आहे. गावात विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरेतसेच रंग दे महाराष्ट्र उपक्रमा रंगवलेली अंगणवाडीआश्रम शाळा आणि डिजीटल लायब्ररी सुविधा आहे. त्याचप्रमाणे, घनकचरा व्यवस्थापन, सौर ऊर्जा प्रकल्प, तसेच ग्रामपंचायत आयएसओ स्टँडर्डकरण्याच्या दृष्टीने  प्रयत्न व्हावेत, असे श्री. परदेशी यांनी सांगितले.
ग्रामपरिवर्तक विजयसिंह राजपूत यांनी यावेळी विविध कामांबाबत सादरीकरण केलेत्यात नवीन अंगणवाड्यांचे बांधकाम, 23 वीज खांब, 100 केव्हीए ट्रान्सफॉर्मर बसविणे,पाणीपुरवठा वाहिनी   दुरुस्तीप्रस्तावित व्यायामशाळाक्रीडांगण विकासस्मशान भूमीचे सौंदर्यीकरणभूमिगत गटारे बांधकाम,  युवकांना कौशल्याधारित रोजगार मिळवून देणे,शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी गट शेती व पूरक व्यवसायांना चालनाशेत मालावर प्रक्रिया, सेंद्रिय शेती आदी कामांचे नियोजन आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्याशशिकला नागमोते यांनी बचत गटाबाबत माहिती दिली.

  सरपंच सौमेघाताई नागदिवे,उपसरपंच विठ्ठलराव उमपग्रामपंचायत सदस्य किरण निस्तानेशरद वानखडेसौप्रतिभा यावलेसौसंगीता अंबुलकरसौअर्चना निस्ताने,तंटामुक्त समिती अध्यक्ष गुणवंतराव उमपउपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायतश्री. मानकरतहसीलदार राम लंकेगट विकास अधिकारी श्री.  वेल्ले , श्री. पतंगराव , वनीकरण अधिकारी  श्री ढोले अभियानाचे प्रवीण पिंजरकर, रत्नशेखर गजभिये,  विजयसिंह राजपूत, विवेक शेळकेवैष्णवी कायलकरस्वप्नील देसलेग्रामसेवक श्री. गभने  माजी सरपंच अरविंद निस्ताने हरिश्चंद्र खैर आदी उपस्थित होते.
                      श्री.  राजपूत यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती