Tuesday, July 17, 2018

अरबी समुद्रातील स्मारकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी केली नाही जगातील सर्वात उंच पुतळा असेल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


नागपूरदि. 17 :  मुंबई येथील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे करण्यात येणाऱ्या स्मारकात जगातील सर्वात उंच पुतळा छत्रपती शिवाजी महाराजांचा असेल. पुतळ्याची उंची कमी केली नाही. हे स्मारक पूर्ण करण्याकरिता जेवढा निधी लागेल तेवढा राज्य शासन देईलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या मुद्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.
मुख्यमंत्री यावेळी म्हणालेकेंद्रीय पर्यावरण विभागाकडे पहिल्यांदा केवळ संकल्प चित्र पाठविण्यात आले होते तो प्रस्ताव नव्हता. हा पुतळा समुद्रात उभारण्यात येणार असल्याने पुतळ्याचे डिझाईन करताना समुद्रातील वारेलाटा यांचा विचार करून आराखडा तयार करण्यात आला आहे. समुद्रात हवेचा दाब सहन करून पुतळा असावा अशा पद्धतीने त्याचा आराखडा केला आहे. पुतळ्याची उंची कमी केली नाहीअसे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...