Tuesday, July 17, 2018

टीडीआर संदर्भातील प्रक्रिया पारदर्शी व सुटसुटीत करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


नागपूरदि. 17 : टीडीआर संदर्भातील प्रक्रिया पारदर्शी व सुटसुटीत करण्याच्या सूचना महानगरपालिकांना देण्यात येतील. तसेच औरंगाबाद महानगरपालिकेच्या तक्रारीबाबत तीन महिन्यात कार्यवाही केली जाईलअसे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
सदस्य इम्तीयाज सय्यद यांनी विचारलेल्या प्रश्नाबाबत उत्तर देताना ते बोलत होते. महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत शासन विचाराधीन असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार विजय काळे यांनी यावेळी झालेल्या चर्चेत भाग घेतला.

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...