राज्य राखीव पोलीस बल येथे रक्तदान शिबिर 67 पिशव्या रक्त संकलित







अमरावती, दि. 24 : राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 9 येथे आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बलाच्या जवानांनी रक्तदान शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद देऊन रक्तदान केले. त्यांच्यामार्फत रक्तदानातून एकूण 67 पिशव्या रक्त संकलित झाले आहे.
            राज्य राखीव पोलीस बल गट क्र.९ आणि जिल्हा सामान्य रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन आज राज्य राखीव पोलीस बलाच्या रुग्णालयात करण्यात आले होते. यावेळी समादेशक मोहन मतानी, सहायक समादेशक प्रभाकर शिंदे, मारुती नेवारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, बलाच्या रुग्णालाच्या डॉक्टर सौ. रुपाली कोरडे, परिचर्या सौ. रचना सिंघम, जिल्हा सामान्य रुग्णालय रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी उमेश आगरकर आदी यावेळी उपस्थित होते.
            कोरोना विषाणूच्या संसर्ग काळात रुग्णांना अतितत्काळ रक्त उपलब्ध व्हावे तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा याविषयी जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आढावा घेतला होता. त्याअनुषंगाने विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्‍य विभागाला दिल्या होत्या. त्याची अंमलबजावणी म्हणून तातडीचे रक्तदान शिबिर राज्य राखीव पोलीस बल येथे आयोजित करण्यात आले. रक्तदान शिबिरात रक्तदान करुन जवानांनी सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपायासह इतर अनुषंगिक बाबींची पूर्तता करण्यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे यातून दिसून आले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती