Sunday, March 22, 2020

होम क्वारंटाईनच्या सूचना असलेल्यांनी स्थलांतर केल्यास महसूल आणि पोलिस यंत्रणेमार्फत कायदेशीर कारवाईचे निर्देश



     कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना म्हणून ज्यांना ‘होम क्वारंटाईन’च्या सूचना दिल्या आहेत त्यांनी  घरातच रहावे. स्थलांतर करू नये अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश राज्य शासनाने आज महसूल आणि पोलिस यंत्रणेला आज देण्यात आले आहेत.
       कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य शासन प्रभावी उपाययोजना करीत आहेत. ज्यांनी बाधीत भागातून प्रवास केला असे अथवा परदेश प्रवासाचा इतिहास असेल किंवा बाधित भागातून प्रवास केलेल्यांच्या निकटचे व्यक्ती असतील अशांना होम क्वारंटाईनच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. ज्या प्रवाशांची विमानतळावर तपासणी होते आणि त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनबाबत स्टॅम्प मारलेला आहे, अशा व्यक्तींनी घरीच थांबण्याच्या सूचना आहेत.
      मुंबई महानगर प्रदेश, पुणे महानगर प्रदेश, नागपूर महानगर प्रदेश येथील ज्या व्यक्तींना होम क्वारंटाईनचे आदेश आहेत त्यांना तेथेच राहण्याची सक्ती करण्यात आली आहे. महसूल आणि पोलिस यंत्रणेतील अधिकारी घरोघरी जाऊन अशा व्यक्तींची तपासणी करतील. संबंधीत व्यक्ती घरात आढळली नाही तर त्यांच्यावर कायदेशीर करवाई करण्याचे निर्देश या यंत्रणेला देण्यात आल्याचे राज्य शासनाकडून आज सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment

DIO NEWS 25-01-2026

  मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा *प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण अमरावती,   दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दा...