Tuesday, March 31, 2020

कलावंत दीपाली बाभुळकर यांचा उपक्रम

                    

 बोलक्या बाहुल्यांच्या व्हिडीओद्वारे जनजागृती

अमरावती, दि. 31 : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी दक्षतापालनाबाबत बोलक्या बाहुल्यांच्या चित्रफितीद्वारे जनजागृती उपक्रम येथील पपेट शो कलावंत दीपाली बाभुळकर यांनी हाती घेतला आहे. त्यामुळे दक्षतापालनाबाबत विविध टिप्स फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून लहानग्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच मिळत आहेत.
श्रीमती बाभुळकर यांनी यापूर्वी निवडणूक कालावधीत ‘चिंगी’ या बोलक्या बाहुलीद्वारे जनजागृती केली होती. आता ‘मीनी’ ही नवी बोलकी बाहुली त्यांनी सादर केली असून, तिच्या चित्रफितीद्वारे त्या जनजागृती करत आहेत. आपल्या मार्मिक शैलीतून हसत खेळत आरोग्य शिक्षण देणारी मीनी ही बाहुली आता लोकप्रिय होत आहे. फेसबुक लाईव्ह व इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून हा कार्यक्रम सादर केला जात आहे.
कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी कुटुंबातील सर्वांनी योग्य दक्षता घेणे आवश्यक आहे. त्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांशी हसत खेळत संवाद साधण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला आहे, असे श्रीमती बाभुळकर म्हणाल्या.
श्रीमती बाभुळकर या दुनिया बोलक्या बाहुल्यांची हा उपक्रम गत 18 वर्षांपासून राबवत असून, सुमारे साडेतीनशे शाळांतून त्यांनी कार्यक्रम सादर केले आहेत. शासनाच्या शिक्षण विभागातर्फे शिक्षण वारी या उपक्रमात त्यांनी हजारो शिक्षकांना बाहुलीनाट्याचे प्रशिक्षण दिले आहे. शारीरीक शिक्षण या विषयावर भारतात झालेल्या जागतिक परिषदेत 28 देशांच्या प्रतिनिधीसमोर त्यांनी हा कार्यक्रम सादर केला आहे.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...